Ad Advertisement Ad Advertisement

AI Impact on Jobs – ‘एआय’मुळे ‘एआय’मुळे मोठा धोका, तयारीत राहा, जोहोचे संस्थापक वेम्बू यांचा इशारा

९० टक्के नोकऱ्या जाणार असल्याची भीती वेम्बू यांनी फेटाळली; मात्र संगणक क्षेत्रातील कामाचे स्वरूप बदलणार, संक्रमणाचा काळ आव्हानात्मक ठरण्याची शक्यता

नवी दिल्ली : AI Impact on Jobs कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) येत्या काळात रोजगाराचे स्वरूप पूर्णपणे बदलणार असल्याचा पुनरुच्चार ‘जोहो’चे संस्थापक आणि सीईओ श्रीधर वेम्बू यांनी केला आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने एकच हुशार व्यक्ती आता १० लोकांचे काम सहज करू शकते, असे सांगत त्यांनी सर्वांना बदलत्या अर्थव्यवस्थेसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे.

श्रीधर वेम्बू यांनी एक्सवर पोस्ट करत हा इशारा दिला आहे. ते म्हणतात, ”संगणकाशी संबंधित प्रत्येक नोकरीला आता हा धोका आहे. एआयचा वापर करून एक स्मार्ट व्यक्ती १० लोकांचे काम करू शकते आणि हा धोका आता अधिक वास्तववादी होत चालला आहे.” AI Impact on Jobs

स्वस्तात कुशल मनुष्यबळ

AI Impact on Jobs एआयमुळे ९० टक्के लोकांच्या नोकऱ्या जातील, ही भीती त्यांनी फेटाळून लावली. त्यांच्या मते, जे उद्योग किंवा लहान कंपन्या आधी सॉफ्टवेअर अभियंते अथवा डिजिटल मार्केटर्सचा खर्च परवडत नसल्यामुळे त्यांची भरती करत नव्हत्या, त्या कंपन्या आता एआयमुळे स्वस्त झालेल्या दरांत अशा लोकांना कामावर ठेवू शकतील, असे वेम्बु यांनी म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेचा पुनर्समतोल

हा बदल सोपा नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेत एक मोठा बदल किंवा पुनर्समतोल घडवून आणेल. हा संक्रमणाचा काळ नक्कीच वेदनादायीअसेल, त्यामुळे आपल्याला हा बदल स्वीकारून पूर्वतयारी करणे हाच एकमेव मार्ग आहे, असे वेम्बू यांनी स्पष्ट केले.

‘जोहो’ कंपनीतील अंतर्गत बदल आणि परिस्थिती

एआय आणि सर्व्हर साठवण क्षमतेच्या (मेमरी) वाढत्या खर्चामुळे जोहो कंपनीवरही आर्थिक ताण आला आहे. कंपनीने या वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक मूल्यमापन रद्द केले असून मार्केटिंग बजेटमध्येही कपात केली आहे. मात्र, सामूहिक कर्मचारी कपात टाळण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. AI Impact on Jobs

इतर जागतिक कंपन्यांची वाटचाल

फक्त जोहोच नव्हे, तर ॲमोझॉनसारख्या दिग्गज कंपन्यांनी आपल्या सॉफ्टवेअर अभियंत्यांसाठी एआय युगात काम करण्याचे नवीन नियम जाहीर केले आहेत. तसेच गेमिंग क्षेत्रातील ‘एपिक गेम्स’सह अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना एआय तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

Read About : Mercury to Gold Conversion – प्राचीन भारतीय रसायनविद्येच्या मदतीने पाऱ्याचे सोन्यात रूपांतर?, MNIT करणार पडताळणी
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.