Ad Advertisement Ad Advertisement

AI Pancreatic Cancer Detection – निदानाच्या 475 दिवस आधीच कर्करोगाचे संकेत

एआय तंत्रज्ञानाची मोठी कामगिरी, सीटी स्कॅनमधील अदृश्य बदल ओळखणारे रेडमोड मॉडेल

लंडन : AI Pancreatic Cancer Detection स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान होण्यापूर्वीच त्याचे सूक्ष्म संकेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने ओळखणे शक्य असल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे. ‘गट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित संशोधनानुसार, रेडमो हे एआय मॉडेल सीटी स्कॅनमधील असे बदल शोधू शकते, जे नियमित तपासणीत डॉक्टरांच्या नजरेतून सुटतात. निदानाच्या सरासरी ४७५ दिवस आधीच हे संकेत ओळखण्यात प्रणालीला यश आले.

संशोधकांनी २१९ रुग्णांच्या सीटी स्कॅनचे विश्लेषण केले. स्कॅनच्या वेळी कर्करोग आढळला नव्हता; मात्र पुढे या सर्व रुग्णांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. या स्कॅनची तुलना कर्करोग नसलेल्या १,२४३ व्यक्तींच्या स्कॅनशी करण्यात आली. निदानापूर्वी दोन वर्षांहून अधिक काळ आधी घेतलेल्या स्कॅनमध्येही एआयने ६८ टक्के प्रकरणांचे अचूक निदान केले. डॉक्टरांची कामगिरी २३ टक्के होती. AI Pancreatic Cancer Detection

सुरुवातीच्या टप्प्यात निदानाची आशा

AI Pancreatic Cancer Detection ही प्रणाली स्वादुपिंडाच्या ऊतींमधील अतिसूक्ष्म नमुने आणि पोतामधील बदल तपासते. तसेच, अवयवाची सीमा स्वयंचलितपणे निश्चित करते. त्यामुळे कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत होऊ शकते. स्वादुपिंडाचा कर्करोग अनेकदा उशिरा लक्षात येत असल्याने उपचार कठीण होतात. मात्र, संशोधकांनी स्पष्ट केले आहे की रेडमोचा नियमित वैद्यकीय वापर सुरू करण्यापूर्वी, विशेषत: उच्च जोखमीच्या रुग्णांमध्ये, मोठ्या प्रमाणावर आणि प्रत्यक्ष परिस्थितीत चाचण्या आवश्यक आहेत. सध्या हे तंत्रज्ञान आशादायक आहे.

Read About: Bio-Hybrid Robots – उंदराच्या पेशींपासून बनवले उड्या मारणारे बायो-हायब्रिड रोबोट्स; शास्त्रज्ञांचा अनोखा शोध
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.