Ad Advertisement Ad Advertisement

India Pakistan Indirect Trade – सिंगापूर, श्रीलंका, दुबईचे नाव; पण पाकिस्तानात पोहोचणारा माल भारताचाच!

भारत-पाकिस्तानमधील थेट व्यापार बंद असतानाही दुबई, सिंगापूर आणि श्रीलंकेमार्गे भारतीय वस्तू पाकिस्तानात पोहोचत असल्याचा ‘डॉन’ वृत्तपत्राचा दावा

नवी दिल्ली : India Pakistan Indirect Trade पाकिस्तानात लोकांना मिळणारी औषधे, कच्च्या माल, प्लास्टिक, पेट्रोलियम, सेंद्रिय रसायने, रबर, चहा, कॉफी, भाज्या, मसाले, धान्य हे थेट सिंगापूर, श्रीलंका, दुबई येथून आयात होतात, असे चित्र आहे. परंतु या सर्व गोष्टी चक्क भारतातून पोहचलेल्या असतात, असा दावा पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तपत्राने केला आहे. दोन्ही देशांमधील थेट व्यापारावर बंदी असतानाही, हे राजरोस होत आहे, फक्त या वस्तू भारतातून आधी सिंगापूर, श्रीलंका, यूएई अशा तिसऱ्या देशांत आणि तेथून मग पाकिस्तानात पोहचतात. पुढे त्यावर त्या त्या देशाचा माल म्हणून शिक्कामोर्तब होते एवढेच.

पाकिस्तानमध्ये भारतीय वस्तूंची मागणी प्रचंड वाढली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या (२०२६-२७) पहिल्या तिमाहीत पाकिस्तानने भारतातून तब्बल ५,८७६ कोटी रुपयांचा (६१.७४ दशलक्ष डॉलर्स) माल आयात केला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात ६९ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत भारताने पाकिस्तानकडून शून्य रुपयांची आयात केली, असे डॉनने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
भारत-पाकिस्तानदरम्यान थेट व्यापार आणि वाघा-अटारी सीमा पूर्णपणे बंद असताना हा भारतीय माल पाकिस्तानात कसा पोहोचतोय? यामागे तिसऱ्या देशांचा (थर्ड पार्टी) मोठा वाटा असल्याचे उघडकीस आले आहे. दोन्ही देशांनी थेट आणि अप्रत्यक्ष आयातीवर बंदी घातली असली तरी, पाकिस्तानातील अंतर्गत मागणीमुळे वरीलप्रमाणे अप्रत्यक्ष मार्गाने वर्षाला सुमारे १० अब्ज डॉलर्सचा भारतीय माल पाकिस्तानात पोहोचत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. India Pakistan Indirect Trade

कसा पोहोचतोय भारतीय माल पाकिस्तानात?

‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ (जीटीआरआय) आणि भू-राजकीय तज्ज्ञांच्या मते, भारतीय माल ‘ग्रे-झोनी’ पद्धतीने पाकिस्तानात पोहोचवला जात आहे. भारतातून निघणारा माल प्रथम दुबई (यूएई), सिंगापूर किंवा कोलंबो (श्रीलंका) यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट हबवर (वस्तू त्याच्या निश्चित ठिकाणी पाोहचविण्यासाठी एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर चढवण्याचे तिसऱ्या देशातील ठिकाण) पाठवला जातो India Pakistan Indirect Trade.

लेबल आणि कागदपत्रे बदलणे

या देशांमधील गोदामांत (बॉन्डेड वेअरहाऊस) माल ठेवला जातो. तेथे कोणताही कर न भरता मालाची मूळ कागदपत्रे आणि लेबल्स बदलले जातात. त्यानंतर या मालाचा ‘उगम देश’ (कंट्री ऑफ ओरिजिन) भारत ऐवजी युएई किंवा सिंगापूर असा दाखवून तो माल पाकिस्तानात पाठवला जातो. या प्रक्रियेमुळे पाकिस्तानातील ग्राहकांना या वस्तू अधिक महाग दराने खरेदी कराव्या लागतात. India Pakistan Indirect Trade

कोणत्या भारतीय वस्तूंना सर्वाधिक मागणी?
  • औषधे : पाकिस्तानात भारतीय औषधे आणि कच्च्या मालाची सर्वात मोठी टंचाई असून त्याला प्रचंड मागणी आहे.
  • इतर वस्तू : प्लास्टिक, पेट्रोलियम, रंग (डाय), सेंद्रिय रसायने, रबर, चहा, कॉफी, भाज्या, मसाले आणि धान्य.

व्यापारबंदीची पार्श्वभूमी

  • २०१९ चा पुलवामा हल्ला : भारताने पाकिस्तानचा ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’ (एमएफएन) दर्जा रद्द केला होता, ज्यामुळे व्यापार घटला.
  • २०२५ चा पहलगाम दहशतवादी हल्ला: या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत, अशी ठाम भूमिका घेत वाघा-अटारी सीमा बंद केली. India Pakistan Indirect Trade

Read About : Binance Crypto Hack – क्रिप्टो जगतातील सर्वात मोठा दरोडा! ‘बायनान्स’मधून 6.3 अब्ज डॉलर लंपास
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.