घनदाट जंगल, हातात बंदूक आणि समोर अनोळखी भयानक शक्ती; २८ मे २०२७ रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित
मुंबई : Akshay Kumar Samuk बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी ‘समुक’ (Samuk) या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या झलकमधून चित्रपटाची कथा एका रहस्यमय आणि भयानक प्राण्याभोवती फिरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अॅक्शन आणि थराराने भरलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार एका अनोळखी शक्तीविरुद्ध लढताना दिसणार आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिल्या लूकसोबत, “शत्रू माणूस नाही; पण लढा मानवतेसाठी आहे. आणि माघार घेण्याचा पर्याय नाही,” असे सूचक वाक्य शेअर केले आहे. त्यामुळे चित्रपटातील संघर्ष नेमका कशासाठी आणि कोणाविरुद्ध असणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रदर्शित झालेल्या झलकीमध्ये अक्षय कुमार गडद रंगाच्या सूटमध्ये दिसत असून, त्याच्या हातात बंदूक आहे. धुक्याने वेढलेल्या घनदाट जंगलात तो एका अदृश्य लक्ष्यावर निशाणा साधताना दिसतो. यानंतर झलकीमध्ये एका विचित्र आणि भयानक प्राण्याची झलक दाखवण्यात आली आहे. मोठा जबडा, धारदार दात आणि तोंडातून ओघळणारा गडद द्रव यामुळे या प्राण्याचे रूप अधिक भयावह वाटते.
चित्रपटाच्या कथानकाबाबत आणि या रहस्यमय प्राण्याच्या स्वरूपाबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिक माहिती उघड केलेली नाही. अक्षय कुमारसोबत रुक्मिणी मैत्रा, विनीत कुमार सिंह, बनिता संधू आणि रजत कपूर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘समुक’ हा चित्रपट २८ मे २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Read About : Ramayana Box Office Collection – 10 दिवसांत ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर धमाका
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.