अनंतपूर जिल्ह्यातील रापताडू येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना; विद्यार्थिनी गंभीर जखमी, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतली दखल, आरोपीला अटक
अनंतपूर (आंध्र प्रदेश) – Andhra Pradesh School Attack आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील रापताडू येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. शाळेच्या वेळेत एका व्यक्तीने १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर वर्गखोलीत घुसून करवतीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थिनीच्या चेहरा आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ती अत्यंत चिंताजनक अवस्थेत आहे. या हल्ल्यात आणखी एक विद्यार्थीही जखमी झाला आहे.
शाळेत पसरली भीती
या भीषण घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी विद्यार्थिनीला तातडीने अनंतपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतली दखल
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी स्वतः पीडित मुलीच्या आईशी फोनवरून संवाद साधून त्यांना धीर दिला आणि मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करेल असे आश्वासन दिले. मंत्री नारा लोकेश यांनी पोलिसांना सुद्धा कठोर कारवाईच्या सूचना केल्या आहेत.
आरोपीला काही तासांतच अटक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच हल्लेखोराचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.
Read About : Panchkula School Attack : तिसरीतील 8 वर्षांच्या मुलाचा केजीतील 6 वर्षांच्या चिमुरडीवर वर्गातच जीवघेणा हल्ला; मुलीची प्रकृती चिंताजनक
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.