Ad Advertisement Ad Advertisement

Anthropic IPO – अँथ्रोपिकचे शेअर बाजारात पदार्पण, नॅसडॅकवर पहिल्याच दिवशी मोठी उडी

आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ : कंपनी संस्थापकांची संपत्ती अब्जावधी डॉलरच्या घरात

न्यूयॉर्क : Anthropic IPO – ‘क्लॉड’ या एआय चॅटबॉटची निर्माती कंपनी अँथ्रोपिक गुरुवारी पहिल्यांदाच न्यूयॉर्कच्या नॅसडॅक शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. आदल्या रात्री कंपनीने शेअरची किंमत ८३ डॉलर निश्चित केली होती. प्रत्यक्ष व्यवहार सुरू झाला तेव्हा भाव १११.५० डॉलरवर उघडला. त्या क्षणी कंपनीचे बाजारमूल्य सुमारे २ ट्रिलियन डॉलरच्या (दोन लाख कोटी डॉलर) जवळ पोहोचले.

नंतर भाव थोडा खाली येऊन सुमारे १०० डॉलरच्या आसपास स्थिरावला. तरीही तो आदल्या दिवसाच्या ८३ डॉलरपेक्षा बराच जास्त आहे. बाजारात उतरण्यापूर्वी अँथ्रोपिकने शेअर विक्रीतून ८१ अब्ज डॉलर उभारले. हा आतापयंर्तचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे वृत्तात म्हटले आहे. कंपनीची स्थापना २०२१ मध्ये सात जणांनी केली. या सातही संस्थापकांची संपत्ती आता अब्जावधी डॉलरांत गेली असल्याचे ‘द गार्डियन’ने म्हटले आहे.

एआयविषयी सांशकता व्यक्त होत असताना मारली बाजी

हे पदार्पण अशा वेळी झाले आहे, जेव्हा एआय उद्योगातील ‘बुडबुडा’ (बबल) फुटण्याची चिन्हे दिसत आहेत का, याबद्दल अनेकजण साशंक आहेत. म्हणजेच कंपन्यांच्या किमती प्रत्यक्ष कमाईपेक्षा खूप फुगल्या आहेत का, हा प्रश्न चर्चेत आहे. अँथ्रोपिकच्या यशस्वी पदार्पणाकडे याच संदर्भात पाहिले जात आहे.

Read About : Data Center Expansion : भारतात ३.५ कोटी चौरस फूट वेअरहाउसिंग जागेची मागणी निर्माण होणार; हैदराबाद-मुंबईला सर्वाधिक फायदा
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.