शुक्रवारी पुष्पनगरी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार
छत्रपती संभाजीनगर : Atul Save Mother Death राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या मातोश्री व दिवंगत खासदार मोरेश्वर सावे यांच्या पत्नी लीलावती मोरेश्वर सावे यांचे गुरुवारी (दि १९) दुपारी तीन वाजता वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी( (दि.२०) खडकेश्वर येथील अंजली कॉम्प्लेक्स, येथून निघून पुष्पनगरी स्मशानभूमी येथे सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.
लीलावती सावे यांच्या पश्चात कमांडर अनिल सावे, अजित सावे,कॅबिनेट मंत्री अतुल सावे ही तीन मुले, मुलगी डॉ. अंजली राऊत. सुना, जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.