Ad Advertisement Ad Advertisement

Beed Road Accident Near Neknoor टिप्पर-पिकअपच्या धडकेत तिघांचा मृत्यू

बीड तालुक्यातील नेकनूरनजिकची घटना; मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश

Beed Road Accident Near Neknoor केज-नेकनूर : टिप्पर आणि पिकअप यांच्यास समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांसह एकूण तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची ही केजपासून २० कि.मी.अंतरावर जोला-सारुळ पाटीजवळ एका पेट्रोलपंपाजवळ अहल्यिानगर-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि.११) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. यात अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पिकअपमधून वाहतूक केल्या जाणाऱ्या दोन गायी आणि तीन बैलही या भीषण अपघातात दगावले. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांची गर्दी झाली होती.

अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्ली येथील रहिवासी असलेले हनीफ शौकत कुरेशी (वय २२) आणि आरेफ शौकत कुरेशी (वय २०) हे दोघे टिप्परने (क्र.एम.एच ४४ यु ९५५७) पिकअपला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या दुर्घटनेत हनीफ कुरेशी व आरेफ कुरेशी या दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत पिकअपमध्ये असलेल्या आणखी एका व्यक्तीचाही यात मृत्यू झाला. त्यांचे नाव समजू शकले नाही. वाहनांची धडक इतकी जोरदार होती की, पिकअपमधील दोन गायी आणि तीन बैलही दगावले.

अपघातात टिप्पर चालक अमोल खंदारे (वय ३०, रा. कारेगव्हाण, ता. केज) आणि पप्पू यादव (वय २५,रा. बिहार) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने बीडला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुटूंबातील दोन कर्त्या तरुणांचा अपघातात अंत झाल्याने अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त होत असून कुरेशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नेकनूर व केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

जखमींना जेसीबीने बाहेर काढले

अपघातात टिप्परमध्ये अडकलेला चालक अमोल खंदारे आणि क्लिनर पप्पू यादव यांना जेसीबीच्या सहाय्याने केबिनला दरवाजा उघडून बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही जखमींना बीड येथील रेणू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून दोघे गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती केज पोलिस ठाण्यात मिळताच पोलिस तत्काळ अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने जेसीबीच्या सहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

अपघाताचा प्रचंड आवाज

या अपघाताची माहिती देताना अपघात स्थळापासून सुमारे अर्धा कि.मी.अंतरावर असलेल्या हॉटेल चालकांनी सांगितले की, अपघात झाल्याचा प्रचंड मोठा आवाज झाला. त्यानंतर त्यांनी बाहेर येऊन पाहिले.

Read About : Firozabad Firing : पतीकडून पत्नी आणि प्रियकरावर गोळीबार; दोघे गंभीर
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.