Ad Advertisement Ad Advertisement

MCOCA Against Rahul Chabukswar संभाजीनगरातील कुख्यात राहुल चाबुकस्वारसह टोळीवर मकोका

बिल्डरकडून उकळले दीड कोटी : साईट्स बंद पाडून फ्लॅट्स बळकावण्याचा प्रयत्न

MCOCA Against Rahul Chabukswar छत्रपती संभाजीनगर : बिल्डरला दिलेल्या एक कोटी रुपयांच्या कर्जापोटी तब्बल दीड कोटी रुपये वसूल करूनही आणखी सव्वाकोटी रुपये किंवा दोन फ्लॅट्सची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत गुंडांमार्फत बांधकाम साईट्स बंद पाडल्या. याप्रकरणी कुख्यात गुन्हेगार राहुल चाबुकस्वारसह त्याच्या टोळीवर शनिवारी (दि.१०) मकोका लावण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

राहुल साहेबराव चाबुकस्वार, प्रवीण पंडितराव गरबडे, निलेश ऊर्फ सुरेश नारायण रांजणे, अमोल शामराव साळुंके, आकाश शामराव साळुंके यांचा मकोका लावण्यात आलेल्यांत समावेश आहे. प्रवीण गरबडेला अटक केली असून न्यायालयाने त्याला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपी फरार आहेत.
आरोपींविरुद्ध मकोका लावण्याचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना सादर केला होता. त्यानुसार आयुक्तांनी ही कारवाई केली. गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस आयुक्तांकडे प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.

चाबुकस्वारविरुद्ध तब्बल २४ गुन्हे

राहुल चाबुकस्वार याच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत तब्बल २४ गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी १४ गुन्हे एकट्या पुंडलिकनगर ठाण्यातील आहेत. याशिवाय जवाहरनगर, क्रांती चौक, पैठण, सिडको, सातारा, एमआयडीसी वाळूज या ठाण्यांत गुन्हे दाखल असून, न्यायालयात आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत.

Read About : Firozabad Firing : पतीकडून पत्नी आणि प्रियकरावर गोळीबार; दोघे गंभीर
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.