पाच सुवर्ण, एका रौप्य पदकासह सहा पदकांची कमाई
छत्रपती संभाजीनगर : Boxing Players Win 5 Gold – सांगली येथे १२ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पार पडलेल्या पहिल्या एलिट पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत केंद्राच्या खेळाडूंनी एकूण सहा पदकांची कमाई करत छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यामध्ये पाच सुवर्ण आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे.
या स्पर्धेत ‘साई’ केंद्राच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे, जिद्दीचे आणि मेहनतीचे दर्शन घडवले. विविध वजनी गटांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करत खेळाडूंनी पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत खुशी जाधव (५१ किलो), देविका घोरपडे (५४ किलो), दिशा पाटील (६० किलो), सृष्टी साठे (६५ किलो) आणि सनी कापसे (९० किलो) यांनी आपापल्या वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. तर वैष्णवी वाघमारे (५७ किलो) हिने रौप्य पदक पटकावून केंद्राच्या पदकसंख्येत भर घातली. याशिवाय ज्ञानदा जामदार (५१ किलो) हिनेही या स्पर्धेत केंद्राचे प्रतिनिधित्व केले.
Read About : Sans Campaign Pneumonia Prevention -चिमुकल्यांचा श्वास वाचविण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला – 2026
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.