Ad Advertisement Ad Advertisement

Chhatrapati Sambhajinagar AC buses सोमवारपासून शहर बसच्या ताफ्यात 34 एसी बसची भर

सात मार्गांची भर पडणार : नागरिकांना दिलासा

Chhatrapati Sambhajinagar AC buses छत्रपती संभाजीनगर : शहर बसच्या ताफ्यात सोमवारपासून (दि.२) ३४ वातानूकुलित बसची भर पडणार आहे. सोमवारी पहाटेपासून या बस रस्त्यावर धावणार आहेत. यापूर्वी शहर परिसरातील २८ रूटवर शहर बस धावत होत्या, त्यात आणखी सात रूटची भर पडली आहे.

स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात २०१६ मध्ये शहर बस सेवा सुरू करण्यात आली होती. टाटा कंपनीकडून त्यासाठी १०० बस खरेदी करण्यात आल्या होत्या. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या पाहता बसची संख्या अत्यंत कमी होती. त्यामुळे स्मार्ट सिटीने ओलेक्ट्रा कंपनीकडून ३५ वातानूकुलित बस भाडेतत्त्वाने घेण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार कंपनीने एक बस दिली. पण, उर्वरित ३४ बस येणे बाकी होते. यासंदर्भात विभागप्रमुख प्रमोद देशमुख यांनी सांगितले, जुन्या १०० पैकी ७७ बस सध्या रस्त्यावर धावतात. या बस २८ रूटवर सुरू होत्या. नव्या ३४ बस प्राप्त झाल्याने आणखी ७ रूट वाढविण्यात आले आहेत. सातारा-देवळाईसह शहर परिसरातील भागात या बस धावणार आहेत.

गर्दीच्या रूटवर ‘लक्ष’

वेरूळ, बजाजनगर, रांजणगाव फुलंब्री, पैठण रोडवर धावणाऱ्या शहर बसला मोठी गर्दी असते. त्यामुळे या वातानूकुलित जास्तीत जास्त बस गर्दीच्या मार्गावर धावणार आहेत. झाल्टा फाटा ते विद्यापीट या रूटवर आता सहा गाड्या धावतील. प्रत्येक १५ मिनिटाला प्रत्येक रूटवर गाडी येईल, असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

२७ बससाठी प्रतीक्षा

पीए ईबस योजनेतून महापालिकेला १०० बस मंजूर झाल्या असून, त्यातील २७ बस महिनाभरापूर्वी प्राप्त झालेल्या आहेत. मात्र, अद्याप चार्चिंग स्टेशन, बस डेपोचे काम शिल्लक असल्याने या बस रस्त्यावर येण्यासाठी किमान दोन महिन्यांचा वेळ लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read About : Manoj Jarange audio clip controversy- जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.