Ad Advertisement Ad Advertisement

Chhatrapati Sambhajinagar Kharif paisewari खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी पन्नास पैशापेक्षा कमी

जिल्ह्यातील १ हजार ३५४ गावांची पैसेवारी ४५.७२ पैसे

Chhatrapati Sambhajinagar Kharif paisewari छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याची खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाने जाहीर असून जिल्ह्यातील सर्वच १ हजार ३५४ गावांमध्ये पैसेवारी ४५.७२ पैसे एवढी निघाली आहे. पिकांची पैसेवारी ५० टक्क्याापेक्षा कमी आल्याने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिीवर शिक्कामोर्तब झाले आहे. तर यापूर्वीच शासनाने पर्जन्यतूट आणि अन्य घटकांमुळे प्रथम कळ लागू करती दुष्काळ जाहीर केला आहे.

दरवर्षी महसूल यंत्रणेच्या मार्फत ३१ ऑक्टोबर रोजी खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात येते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ही पैसेवारी जाहीर केली. जिल्ह्यात खरीपचे पेरणी क्षेत्र ७ लाख ९१ हजार ५९४ हेक्टर असून त्यापैकी ७ लाख ५४ हजार ९५२ हेक्टरवर यंदा खरीप पिकांचा पेरा झाला. मात्र, जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. जुलै महिन्यात झालेल्या थोड्या पावसावर पेरा करण्यात आली. जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या सुुरुवातीला थोडा पाऊस झाला.

मात्र, त्यानंतर पावसाने कायमची दडी मारली. सर्वदूर दमदार पाऊस झाला नाही. एवढेच नाही तर पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने मोठा खंड दिला. परिणामी पिकांना मोठा फटका बसला. पाऊस नसल्याने खरीप पिकांचे उत्पादन चांगलेच घटल्याचे महसूल विभागाने केलेल्या पैसेवारीमधून समोर आले आहे.

खरीपसाठी १ हजार १९३ तर रब्बीसाठी १६१ एशी एकूण १ हजार ३५४ गावांमध्ये पैसेवारीची मोजणी झाली असून या सर्व गावात पैसेवारी ही सरासरी ४५.७२ पैसे एवढी निघाली आहे. वैजापूर, खुलताबाद आणि कन्नड या तीन तालु्क्यात सर्वात कमी म्हणजे ४४.०० पैसेवारी नोंदविली गेली, तर सर्वाधिक ४८.७ पैसवारी गंगापूर तालुक्यात नोंदविली गेली. ५० पैशा पेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यावर प्रशासनानेच शिक्कमोर्तब केले आहे.

पैसेवारीतून आठ गावे वगळली

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १९ गावांचा समावेश महापालिका हद्दीत असल्यान तसेच पैठण तालुक्यातील एकूण गावांची संख्या १९३ असून त्यापैकी ४ गावे ही पालिका क्षेत्रात असल्याने या गावांची पैसैवारी जाहीर करण्यात आली नाही. तर गंगापूर तालुक्यात एकूण २२६ गावे आहेत. यापैकी चार गावे जायकवाडी प्रकल्पात संपादीत असल्याने २२२ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.

खरीप पेरणी क्षेत्र आणि घोषित केलेली सुधारित पैसैवारी (पेरणी क्षेत्र हेक्टर मध्ये)
तालुका पेरणी केलेले क्षेत्र घोषित केलेली पैसैवारी ( पैसे)
अपर तहसील ११६९४.५६ ४८.००
छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) ६६७५७.५५ ४५.००
पैठण १०६६९६ ४६.११
फुलंब्री ५६६५९ ४७.००
वैजापूर १३३८८९ ४४.००
गंगापूर ९८८१० ४८.०७
खुलताबाद ३५६५० ४४.००
सिल्लोड ९८७५०.०७ ४६.००
कन्नड १०४८६२ ४४.००
सोयगाव ४१२०४ ४५.००
एकूण ७५४९७२.१८ ४५.७२

Read About: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.