महिलेने विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याची दिली धमकी
छत्रपती संभाजीनगर : Crime Branch Team Attacked – संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपीच्या नातेवाईकांनी लोखंडी रॉड, लाकडी दांड्यासह दगडाने हल्ला करून जखमी केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान किराडपुरा भागातील डीपीजवळ घडली. यावेळी पोलिसांना शिवीगाळ करून विनयभंगाचे गुन्हे दाखल करून तुमची नोकरी घालविण्याची धमकी दिली. हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव जगदीश खिल्लारे, त्याचा भाऊ, महिला व अन्य एक व्यक्ती असा आहे.
या प्रकरणात पोलीस हवालदार संजय विठ्ठल गावंडे यांनी तक्रार दाखल केली. संजय गावंडे हे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. पोलीस उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर यांच्यासह गावंडे हे शोन पवार, तुषार सपकाळ, निहाल सोनटक्के व चालक शरद सूर्यवंशी हे गस्तीवर असता २७ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान किराडपुरा चौक डीपी जवळ एक संशयित पथकाला पाहून पळाला. त्याचा पाठलाग करून गावंडे व त्यांच्या सहकाऱ्याने केला. संशयित पत्र्याच्या शेडमध्ये गेला. या ठिकाणी पोलीस गेल्यानंतर दोन जण आले. पोलिसांनी दोघांना आयकार्ड दाखवून स्वत:ची ओळख करून दिली.
दरम्यान, पोलिसांसमोर आलेल्या पैकी एक जण हा संशयित जगदीश खिल्लारे असल्याचे निष्पन्न झाले. आम्हाला पाहून का पळाला, असे विचारले असता, जगदीश खिल्लारे याने धक्का बुक्की सुरू केली.
लोखंडी रॉड, लाकडी दांड्याने हल्ला
दरम्यान जगदीश खिल्लारे याने धक्काबुक्की करून त्याच्या भावासह पोलीस पथकावर लाकडी दांड्यासह लोखंडी रॉडने हल्ला केला. दरम्यान जगदीश खिल्लारे याने मदतीसाठी महिलेला बोलावून घेतले. या ठिकाणी महिलेसोबत एक आणखी व्यक्ती आला. सदर व्यक्तीने पोलिसांना मारहाण केली. या दोघांनी तुमच्यासारख्या पोलिसांना आम्ही बघून घेऊ असे म्हणून अश्लील शिवीगाळ करून हुज्जत करू लागले. तसेच तेथे पडलेल्या दगडाने मारून जखमी करण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेने मी तुमच्यावर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करून तुमची नोकरी घालविते. अशी धमकी दिली.
हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणात संजय गावंडे यांच्या तक्रारीवरून, त्यांच्या पथकावर हल्ला करणाऱ्या जगदीश खिल्लारे याच्यासह त्याचा भाऊ, महिला व एक व्यक्ती या चौघांच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सानप यांच्याकडे देण्यात आला आहे.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : थकीत वेतनासाठी १.८० लाखांची लाच; कला शिक्षकास रंगेहात पकडले! – Art Teacher Bribe Case
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.