Ad Advertisement Ad Advertisement

Delimitation Bill – मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे; उपमुख्यमंत्री शिंदेंनी मांडली भूमिका

डिलिमिटेनचे समर्थ करणाऱ्या शरद पवार आणि एम. के. स्टॅलिन यांचे स्वागत

मुंबई : Delimitation Bill – मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण ही देशाच्या विकासाला चालना देणारी तसेच लोकशाही अधिक बळकट करणारी महत्त्वाची विधेयके आहेत. या विधेयकांच्या आवश्यकतेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्यासारख्या अन्य नेत्यांनीही समर्थन दिले आहे. या विधेयकांना जो कोणी पाठिंबा देईल, त्या सर्वांचे मी स्वागत करतो, अशी भूमिका शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या 22 ते 26 लाखांपर्यंत पोहोचली आहे. शंभर किलोमीटरपेक्षा अधिक परिघाचे मतदारसंघ आहेत. इतक्या मोठ्या मतदारसंख्येला न्याय देण्यासाठी, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक आहे. त्यामुळे डिलिमिटेशन विधेयकाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असून, पक्षाचे सर्व खासदार या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

विकासाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असून, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिक प्रभावी असणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना महत्त्वाची असल्याचे शिंदे म्हणाले.

माता-भगिनींना राजकारणात अधिक संधी

महिला आरक्षण विधेयकामुळे महिलांना लोकसभा आणि विधानसभा स्तरावर जनसेवेची संधी अधिक व्यापक होईल. महिलांना राजकीय क्षेत्रात न्याय मिळण्याच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवून महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुष्काळी परिस्थितीत महिलांना मिळणारा आधारही अधोरेखित झाला आहे. महिला आरक्षणामुळे माता-भगिनींना राजकारणात अधिक संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधेयक मंजूर होणे ऐतिहासिक टप्पा ठरेल

डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण या दोन्ही विधेयकांना समर्थन देणाऱ्या सर्व नेत्यांचे स्वागत करत, 30 तारखेला ही विधेयके मंजूर झाल्यास देशाच्या इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पा ठरेल, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read About : पार्किन्सन्सच्या रुग्णाला मेंदूतील उपकरणामुळे मोठा दिलासा – Deep Brain Stimulation for Parkinson’s Disease

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.