Ad Advertisement Ad Advertisement

Delivery Boy Viral Video : चेंबूरच्या लिफ्टमध्ये डिलिव्हरी बॉयचे विचित्र कृत्य; पोलिसांकडून शोध सुरू

सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : Delivery Boy Viral Video चेंबूर परिसरातील एका उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये ऑनलाईन खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी आलेल्या एका डिलिव्हरी बॉयने लिफ्टमध्ये स्वतःच्या हातात लघवी करून ती प्यायल्याचा संतापजनक आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण किळसवाण्या कृत्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकार उघडकीस

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील एका इमारतीत हा डिलिव्हरी बॉय ग्राहकाला जेवणाची डिलिव्हरी देण्यासाठी आला होता. इमारतीच्या लिफ्टमधून वर जात असताना, लिफ्टमध्ये कोणीही नसल्याचे पाहून त्याने हे विचित्र कृत्य केले. लिफ्टच्या कोपऱ्यात जाऊन त्याने स्वतःच्या हातात लघवी केली आणि ती प्यायल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. हा सर्व प्रकार सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी सीसीटीव्ही स्क्रीनवर पाहिल्यानंतर तात्काळ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना आणि रहिवाशांना याची माहिती दिली.

डिलिव्हरी कंपनी आणि पोलिसांकडून शोध सुरू

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या अन्न सुरक्षेवर आणि डिलिव्हरी बॉईजच्या मानसिक स्थितीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा डिलिव्हरी बॉय नक्की कोणत्या कंपनीचा होता, याची चौकशी सुरू आहे.

स्थानिक पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित डिलिव्हरी बॉयचा शोध सुरू केला आहे. त्याने हे कृत्य कोणत्या मानसिकतेतून केले, तो कोणत्याही नशेखाली होता का, किंवा त्याला एखादा गंभीर आजार आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Read About : Rajkot Fake Currency – इन्स्टाग्राम रील पाहून भाजी विक्रेत्याने छापल्या बनावट नोटा; राजकोट पोलिसांची मोठी कारवाई
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.