Ad Advertisement Ad Advertisement

Gaya Pind Daan – परदेशी भाविकांकडून पूर्वजांसाठी पिंडदान, तर्पण

फ्रान्स, रशिया, जर्मनीसह नऊ देशांतील नागरिकांचा सहभाग; गया येथील देवघाटावर हिंदू परंपरेनुसार विधी

गया : Gaya Pind Daan बिहारमधील गया जिल्ह्यातील फल्गू नदीच्या काठावरील ऐतिहासिक देवघाटावर शुक्रवारी एक आगळेवेगळे दृश्य पाहायला मिळाले. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी आणि त्यांना मोक्ष मिळावा, या श्रद्धेतून परदेशी भाविकांनी हिंदू परंपरेनुसार पिंडदान आणि तर्पण विधी केले. या विधींमध्ये फ्रान्स, रशिया, जर्मनी, इटली, युक्रेन, स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड आणि घाना या देशांतील नागरिक सहभागी झाले होते.

या परदेशी भाविकांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात आले. भारतीय धार्मिक परंपरेनुसार पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्यासाठी विधी करण्यासाठी हे भाविक गया येथे आले होते.

गया येथील पितृपक्ष मेळाव्याला देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहतात. पितरांच्या स्मरणार्थ पिंडदान आणि तर्पण करण्यासाठी गया हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. यंदा परदेशी नागरिकांनीही या धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतल्याने देवघाटावरील हा प्रसंग विशेष ठरला.

Read About : Varun Dhawan Captain Smit Machchhar – कॅप्टन स्मित मच्छर यांच्या धैर्याला वरुण धवनचा सलाम
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.