ओपनएआयच्या नव्या सायबरसुरक्षा मॉडेलने फायरफॉक्समधील ८१ गंभीर त्रुटी शोधल्याचा दावा; लिनक्स कर्नेलमधील ९४८ त्रुटींवर यशस्वी काम, मात्र गैरवापराची भीतीही व्यक्त
नवी दिल्ली : GPT-6 Cyber Launch कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओपनएआयने सॉफ्टवेअरमधील सुरक्षा त्रुटी शोधून त्या दुरुस्त करण्यासाठी ‘जीपीटी-६ सायबर’ हे नवीन आणि अत्यंत प्रगत सायबरसुरक्षा मॉडेल अधिकृतपणे लाँच केले आहे. या नवीन मॉडेलने फायरफॉक्स ब्राउसरमधील ८१ अज्ञात त्रुटी शोधल्या आहेत, ज्या आधी कधीही समोर आल्या नव्हत्या. तसेच लिनक्स कार्नेलमधील ९४८ त्रुटीची दुरुस्ती करून त्याची क्षमता सिद्ध केली आहे.
‘जीपीटी-६ सायबर’ची प्रमुख कामगिरी
फायरफॉक्समधील त्रुटी: ओपन एआयने शोधलेल्या ८१ उच्च-गंभीरतेच्या त्रुटींची माहिती मोझिला कंपनीला दिली, ज्यावर कंपनीने तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू केले. तसेच मोझिलाच्या आधीच्या माहितीपेक्षा ३० अधिक गंभीर समस्या या मॉडेलने हेरल्या. लिनक्स कर्नेल टेस्टिंग : या मॉडेलने १,७२४ त्रुटी शोधून काढल्या आणि त्यापैकी ९४८ त्रुटींवर यशस्वी काम केले. ही क्षमता मागील ‘जीपीटी-५.६ सोल’ मॉडेलपेक्षा तब्बल पाच पट अधिक आहे.
- बेंचमार्क स्कोअर: एक्स्पॉईट जिम बेंचमार्कवर या मॉडेलने ४८.५ टक्के गुण मिळवले, जे मागील आवृत्तीपेक्षा ५१% अधिक सुधारणा दर्शवतात.
- सुरक्षित सीमांचे पालन : हे मॉडेल अधिकृत चाचणीच्या मर्यादेत राहून काम करते. चाचण्यादरम्यान ९९.९३% ते १००% वेळा ते मंजूर केलेल्या मर्यादेबाहेर गेले नाही, ज्यामुळे सुरक्षेची खात्री पटते.
चिंतेची बाजू आणि सुरक्षा उपाय
या मॉडेलच्या प्रचंड क्षमतेमुळे याचा गैरवापर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. ड्रॅगोस या सायबरसुरक्षा कंपनीने एका डमी उर्जा प्रकल्पाच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीदरम्यान, या मॉडेलने पॉवर ग्रीडच्या अभियांत्रिकी सॉफ्टवेअरमधील दोन नवीन त्रुटी शोधून काढल्या, ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर उपाय म्हणून ओपन एआयने यात सायबर-विशिष्ट मॉनिटरिंग, थ्रेट मॉनिटरिंग, सँडबॉक्सिंग आणि मानवी देखरेख यांसारखे कडेकोट सुरक्षा उपाय जोडले आहेत.
अशी आहे उपलब्धता
सध्या हे मॉडेल निवडक आणि अधिकृत ग्राहकांसाठी एपीआय आणि कोडेक्सद्वारे उपलब्ध करून दिले जात आहे. सरकारी संस्था आणि मूलभूत सेवा पुरवणाऱ्या मर्यादित संसाधने असलेल्या सुरक्षा रक्षकांसाठी कंपनीने १ अब्ज डॉलर्सचा ‘डेब्रेक ग्रँट प्रोग्राम’ जाहीर केला आहे.
Read About : Nuclear Explosion Asteroid Deflection – अणुस्फोट लघुग्रहाच्या धडकेपासून पृथ्वीला वाचवू शकतो, पण…
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.