Ad Advertisement Ad Advertisement

Gujarat Crime : पतीला सोडून गेलेल्या महिलेला झाडाला बांधून मारहाण; ‘शुद्धीकरणा’ च्या नावाखाली अत्याचार

सुरेंद्रनगरमध्ये अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; पोलिसांकडून पतीसह नऊ आरोपींना अटक
नेमकी घटना काय?

सुरेंद्रनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या पतीला सोडून दुसऱ्या एका पुरुषासोबत राहू लागली होती. तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी या संबंधाला तीव्र विरोध केला होता. सुरुवातीला तिला घरात कोंडून ठेवले होते. तिथून सुटका करून ती महिला जेव्हा पुन्हा पळून गेली, तेव्हा आरोपींनी तिचा पाठलाग केला आणि तिला त्या दुसऱ्या पुरुषासोबत पकडले.

शुद्धीकरणाच्या नावाखाली क्रूरतेचा कळस

आरोपींनी त्या महिलेला आणि तिच्यासोबत असलेल्या पुरुषाला बळजबरीने सुरेंद्रनगर येथे आणले. तिथे शुद्धीकरण विधीच्या नावाखाली क्रूरतेचा कळस गाठण्यात आला. आरोपींनी महिलेला एका झाडाला बांधले आणि लाकडी काठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर, सर्व आरोपींनी मिळून तिच्यासोबत असलेल्या पुरुषाला तिच्यावर अत्याचार करण्यास भाग पाडले. हा सर्व अघोरी प्रकार आरोपी उभे राहून पाहत होते.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

आरोपींनी या अमानुष मारहाणीचे आणि अत्याचाराचे व्हिडिओ आणि फोटो स्वत:च्या मोबाईलमध्ये चित्रित केले होते. हा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. व्हिडिओ समोर येताच सुरेंद्रनगरचे पोलीस अधीक्षक प्रेमसुख डेलू यांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली.

नऊ आरोपी जेरबंद

पोलिसांनी आधी पीडित महिलेचा शोध घेऊन तिची चौकशी केली, तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला हा सर्व भयानक प्रसंग पोलिसांना सांगितला. पोलिसांनी कारवाई करत या गुन्ह्यात सामील असलेल्या नऊ आरोपींना अटक केली आहे, ज्यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या महिलांनीही पीडितेला मारहाण करण्यात आरोपींना साथ दिली होती. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Read About : Triple Murder 2026 : देहरादूनमध्ये भरदिवसा तिहेरी हत्याकांड; वृद्ध दांपत्यासह मोलकरणीची हत्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.