Ad Advertisement Ad Advertisement

अवैध सावकारीचा पर्दाफाश! ज्ञानेश्वर कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल – Illegal Moneylending Nanded

गणेशनगरमधील निवासस्थानी झडती; सावकारीसंबंधी २३ कागदपत्रे जप्त, जिल्हा प्रशासनाची कारवाई

नांदेड : Illegal Moneylending Nanded अवैध सावकारीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गणेशनगर येथील ज्ञानेश्वर विठ्ठलराव कदम यांच्याविरुद्ध अवैध सावकारी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या झडतीत सावकारीशी संबंधित तब्बल २३ कागदपत्रे आढळून आली आहेत.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अवैध सावकारीच्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये चौकशीचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सहकार अधिकारी श्रेणी-१ एम. आर. येवते यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त करण्यात आले.

या पथकाने २६ नोव्हेंबर रोजी ज्ञानेश्वर कदम यांच्या गणेशनगर येथील निवासस्थानी घरझडती घेतली. यावेळी अवैध सावकारीशी संबंधित २३ कागदपत्रे आढळून आली. या कागदपत्रांच्या आधारे २७ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे आणि उपनिबंधक ए. डी. भागानगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

अवैध सावकारी करणाऱ्यांची तक्रार करा!

परवान्याशिवाय सावकारी करणे किंवा अवाजवी व्याजदराने कर्ज देऊन नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणे हा कायद्याने दंडनीय प्रकार आहे. अशा प्रकारांना बळी पडलेल्या नागरिकांनी न घाबरता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड किंवा संबंधित तालुक्यातील उपनिबंधक व सहायक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी केले आहे.

Read About : दातार चौकात गांजा विक्रीचा पर्दाफाश; 1 किलो 246 ग्रॅम गांजा जप्त – Nanded Ganja Seizure
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.