Ad Advertisement Ad Advertisement

Kuntala Village Telangana : 150 वर्षांचा इतिहास निम्म्याहून जास्त गावकऱ्यांचे नाव एकच

अनोखी परंपरा! तेलंगणातील या गावात प्रत्येक मुला-मुलीचे नाव देवीच्या नावावर

Kuntala Village Telangana निर्मल : देशात विविध गावात अनेक प्रथा परंपरा आहे. त्या प्रथा परंपरा आजही कायम आहेत. एक असे गावा आहे जेथे जन्माला आलेल्या प्रत्येक मुला-मुलींची नावे स्थानिक देवीच्या नावावरून ठेवले जाते. हे गाव तेलंगणातील निर्मल जिल्ह्यामध्ये आहे. त्याचे नाव कुंतला आहे.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, या गावाला सुमारे १५० वर्षांचा इतिहास आहे. कुंतला येथील लोकांची कुलदेवता गज्जालम्मा आहे. गावात गज्जालम्माचे मंदिरही आहे. मंदिराच्या वर्धापनदिनासोबतच, गावकरी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दर रविवारी, जगभरातील भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. शिवाय तेलंगणा, महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांतून भक्त कुंतला येथील गज्जालम्मा मंदिरात मोठ्या संख्येने येतात. देवीसाठी येथे एक जत्राही भरते. कांदा आणि पुतना प्रसाद म्हणून अर्पण केले जातात. नवसही फेडले जातात.

अशी केली देवीची मूर्ती स्थापित

कुंतला गावातील मुसारी घराण्यातील लोक शिकारीसाठी जंगलात जात असत. स्थानिक लोक सांगतात की, एके दिवशी मुत्याम नावाच्या एका माणसाला स्वप्नात एका तलावात एक मूर्ती दिसली. तिचे नाव गज्जालम्मा होते. तिची पूजा केल्यास सर्व काही ठीक होईल असे सांगितले. स्वप्न पडलेल्या व्यक्तीने गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितल्यावर, ते सर्वजण एकत्र गेले. तलावातून देवीची मूर्ती आणली, ती गावात एका झाडाखाली स्थापित केली. गावकऱ्यांनी नियमित पूजा सुरू केली. नंतर एक छोटे मंदिरही बांधले गेले. त्यानंतर, सरकार, स्थानिक आमदारांच्या मदतीने मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.

देवीचे नाव देण्याची प्रथा

कुंतला गावातील लोकसंख्या साडेचार हजारांपेक्षा जास्त आहे. मात्र, यातील अर्ध्याहून अधिक लोकांची नावे त्यांच्या देवीच्या नावावरून आहेत हे विशेष. या गावात जन्मलेल्या मुलांना गज्जालम्माच्या नावावरून नाव देण्याची प्रथा आहे. जर मुलगी असेल तर तिला गज्जव्व आणि जर मुलगा असेल तर त्याला गज्जैय्या, गज्जाराम, गज्जगौड अशी नाव ठेवली जातात. गावात लावलेल्या दुकानांची नावेही देवीच्या नावावरून आहेत. लग्न, जावळ यांसारख्या कोणत्याही शुभ कार्यक्रमापूर्वी गज्जालम्माला बोनाम अर्पण करणे बंधनकारक आहे, असे ग्रामस्थ सांगतात.

Read About : World’s Shortest Scheduled Flight : काय हे… विमान प्रवास फक्त ८० सेकंदांचा!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.