Ad Advertisement Ad Advertisement

Marathwada Crop Damage Assessment : मराठवाड्यात 41.30 लाख हेक्टरवरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

१५ दिवसांत ९२.८७ टक्के काम; हिंगोली, धाराशिव, परभणी जिल्ह्यांत शंभर टक्के पंचनामे

Marathwada crop damage assessment छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण ३८ टक्क्यांनी कमी राहिल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली असून, विभागातील ४१ लाख ३० हजार हेक्टरवरील म्हणजेच ९२.८७ टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार १७४ गावांतील ४५ लाख ४७ हजार ४६० शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाने नुकतीच दिली.

मराठवाड्यात खरीप पिके आणि फळबागांचे एकूण लागवड क्षेत्र ५२ लाख ३२ हजार ४७४ हेक्टर आहे. शासनाच्या आदेशानुसार ५ ऑक्टोबरपासून पंचनाम्यांना सुरुवात झाली. पंधरा दिवसांत ९२ टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पंचनाम्यांचे काम सुरू आहे. हिंगोली, धाराशिव आणि परभणी या तीन जिल्ह्यांतील पीक नुकसानीचे पंचनामे शंभर टक्के पूर्ण झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यात ६ लाख ६४ हजार १० हेक्टर, परभणी जिल्ह्यात ५ लाख ५२ हजार ४३३ हेक्टर, तर हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ९४ हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.

बीड जिल्ह्यात ७ लाख ४२ हजार १६३ हेक्टरवरील ९४ टक्के, नांदेड जिल्ह्यात ७ लाख ६२ हजार ९८१ हेक्टरवरील ९१ टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७ लाख ३ हजार २९० हेक्टरवरील ९० टक्के, लातूर जिल्ह्यात ५ लाख ८४ हजार ७८ हेक्टरवरील ९० टक्के, तर जालना जिल्ह्यात ५ लाख ५२ हजार १७४ हेक्टरवरील ८१ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

नुकसानभरपाईच्या निर्णयाकडे लक्ष Marathwada crop damage assessment

पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उर्वरित पंचनामे लवकर पूर्ण करण्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत कधी मिळणार, याकडे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read About: Shivaji Maharaj Drought Management Farmer Welfare – 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुष्काळ कसा संपवला होता? उपाय वाचून व्हाल थक्क..!

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.