Ad Advertisement Ad Advertisement

MKD Disease : एमकेडी आजारामागे नॅचरल किलर पेशींचा बिघाड कारणीभूत; रोगप्रतिकारक शक्तीचे नवे रहस्य उलगडले!

ऑस्ट्रेलियातील गार्व्हन इन्स्टिट्यूटच्या संशोधकांचा महत्त्वपूर्ण शोध; ३० वर्षांपासूनची वैद्यकीय समजूत बदलली, वारंवार ताप आणि सांधेदुखीमागचे कारण स्पष्ट

सिडनी : MKD Disease मानवी रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यप्रणालीतील एक अत्यंत महत्त्वाचे रहस्य ऑस्ट्रेलियातील गार्व्हन इन्स्टट्यिूट ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधकांनी उलगडले आहे. मेव्हॅलोनेट कायनेज डेफिशियन्सी (एमकेडी) या दुर्मिळ आनुवंशिक आजारामागे शरीरातील नॅचरल किलर पेशींमधील बिघाड कारणीभूत असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. या शोधामुळे गेल्या ३० वर्षांपासूनची जुनी वैद्यकीय समजूत बदलली आहे.

आतापर्यंत वैद्यकीय जगतात असे मानले जात होते की, एमकेडी आजारात होणाऱ्या तीव्र दाहासाठी मॅक्रोफेजेस नावाच्या पेशी जबाबदार असतात. मात्र, प्राध्यापक माईक रॉजर्स आणि डॉ. मार्सिया मुनोझ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोनाश विद्यापीठाच्या सहकार्याने केलेल्या संशोधनात हा दावा खोडून काढला आहे. सर्वसाधारणपणे नॅचरल किलर पेशी विषाणूबाधित पेशींना नष्ट करण्याचे काम करतात. परंतु, एमकेडी रुग्णांमध्ये या पेशी पूर्णपणे परिपक्व होत नाहीत आणि त्यांच्यातील विषाणू नष्ट करणारे घातक कण पेशीच्या आतच अडकून राहतात.

लक्ष्य नष्ट करण्यात अपयशी ठरल्यामुळे या पेशी शरीराला मदतीचा संदेश देण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंटरफेरॉन गॅमा हे दाहक रसायन स्रवतात. यामुळे रुग्णांमध्ये वारंवार तीव्र ताप येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी आणि अवयवांचे गंभीर नुकसान होणे अशी लक्षणे दिसून येतात. सध्याच्या उपचारांना निम्म्याहून अधिक रुग्ण प्रतिसाद देत नाहीत.

Read About : BMI and Healthy Aging : वयाच्या 65 वर्षांनंतर थोडे जास्त वजन फायदेशीर ठरू शकते? संशोधनातून महत्त्वाची माहिती

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.