Ad Advertisement Ad Advertisement

MLM Fraud in Chhatrapati Sambhajinagar – 3 वर्षांपासून फरार भामट्यांनी थाटली नवीन कंपनी; सेमिनार सुरु असताना ठोकल्या बेड्या

सिडको पोलिसांची जालन्यात धाड : दिशा टोटल मार्केटिंग सोल्युशन कंपनी फसवणूक प्रकरणात कारवाई

छत्रपती संभाजीनगर : MLM Fraud in Chhatrapati Sambhajinagar दिशा टोटल मार्केटिंग प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून मल्टी लेव्हल मार्केटिंगच्या (एमएलएम) नावाखाली गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घालून तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोन भामट्यांना सिडको पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात फरार असतानाच भामट्यांनी काही महिन्यांपूर्वी चक्क स्वत:ची नवीन कंपनी थाटली. त्यामाध्यातून लोकांना भूलथापा देण्याचे काम सुरु केले होते. जालना येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा सेमिनार सुरु असतानाच पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या, हे विशेष.

श्याम साहेबराव कवडे (३५, रा. भायगव्हाण, ता. घनसावंगी) आणि संतराम जनार्धन कणके (५४, रा. भांबेरी, ता. अंबड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सिडको ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. तसेच, दिशा टोटल मार्केटिंग कंपनीचा संचालक संजय रघुनाथ दुसाने आणि त्याची पत्नी मीरा दुसाने हे दोघे अद्याप फरारच आहेत. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. दरम्यान, फरार काळात कवडे याने स्वत:चीच व्हिजन हेल्थ अँड वेल्थ नावाची नवीन कंपनी सुरू केली आणि स्वत: तिचा एमडी बनला होता. कणके याला डायमंड पद दिले होते.

९ फेब्रुवारी २०२३ रोजी सिडको पोलीस ठाण्यात दिशा टोटल मार्केटिंग सोल्युशन प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून मल्टी लेव्हल मार्केटिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. ८ हजार ४९९ रुपयांत नोंदणी आणि ५२ आठवडे प्रत्येकी १ हजार रुपयांचे रिपर्चेस केल्यास वर्षभरात ७ लाख ६६० रुपयांचा भरघोस परतावा देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. २०१८ मध्ये जालना रोडवरील हॉटेल रिव्हेरा एक्झिक्युटिव्हमध्ये सेमिनारही घेतला होता. यात कवडे याने स्वत:चा नातेवाईक असलेल्या एका वृत्तवाहिनीचे मल्टीमीडिया प्रोड्युसर चंद्रकांत जगताप यांना ८ आयडीच्या नावाखाली ३ लाख २४ हजार १८ रुपयांचा गंडा घातला होता. या गुन्ह्यात संजय दुसाने, त्याची पत्नी मीरा दुसाने, श्याम कवडे आणि संतराम कणके हे चौघेही तीन वर्षांपासून फरार होते. उपनिरीक्षक अमोल जगताप अधिक तपास करीत आहेत.

काय आहे मूळ प्रकरण?

भूलथापांचा सेमिनार सुरु असतानाच पोलिसांची एन्ट्री
  • बी.ए. पदवीधर असलेला श्याम कवडे पूर्वी सिडकोतील मानसी हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करायचा, तर त्याचा साथीदार संतराम कणके हा सातवी पास असून पूर्वी शेती करायचा.
  • पहिल्या गुन्ह्यात फरार असताना त्यांनी व्हिजन हेल्थ अँड वेल्थ नावाची नवीन कंपनी सुरु केली. जालन्यात नवीन कंपनीचा सेमिनार घेऊन पुन्हा लोकांना जाळ्यात ओढत असल्याची माहिती सिडको पोलिसांना मिळाली होती.
  • त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल जगताप, हवालदार किरण काळे आणि अनिल पवार यांच्या पथकाने थेट चालू कार्यक्रमात छापा मारून दोघांना ताब्यात घेतले.
व्हॉट्सॲप स्टेटसने केला घात!

आरोपी संतराम कणके याने स्वत:च्या व्हॉट्सॲप स्टेटसला या सेमिनारचे पोस्टर ठेवले होते. तीन वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या भामट्यांना स्वत:च्याच व्हॉट्सॲप स्टेटसवरील सेमिनारच्या जाहिरातीने तुरुंगाचा रस्ता दाखवला, हे यावरून दिसते.

स्थानिक एजंटांचे कनेक्शन

जालन्यात झालेल्या या सेमिनारच्या पोस्टरवर छत्रपती संभाजीनगर आणि वाळूजमधील दोन व्यक्तींची नावे डायमंड आणि प्लॅटिनम म्हणून छापलेली आहेत. तसेच ठाणे आणि नाशिकचेही लोक यात आहेत. त्यामुळे या नव्या कंपनीने छत्रपती संभाजीनगर आणि वाळूज परिसरात पुन्हा आणखी काही लोकांना गंडा घातल्याचा अंदाज बांधला जात आहे. २०२३ च्या गुन्ह्यात किती लोकांची फसवणूक झाली होती? याचाही पोलीस तपास करीत आहेत.

Read About : Sambhajinagar House Burglary – बंद घरे टार्गेट; दोन घरे फोडून 21 तोळे सोने लंपास
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.