Ad Advertisement Ad Advertisement

Silk Nanocomposite Film for Dengue Control : चांदीच्या नॅनोकणांमुळे डेंग्यूच्या अळ्या, कोषांचे 100% निर्मूलन

रेशमाच्या प्रथिनांपासून तयार केलेल्या विशेष फिल्ममध्ये चांदीचे नॅनोकण मिसळून एडिस इजिप्ती डासांच्या अळ्या आणि कोष नष्ट करण्यात यश

पुणे : Silk Nanocomposite Film for Dengue Control डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव आणि डासांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातील शास्त्रज्ञांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. रेशमाच्या प्रथिनांपासून (सिल्क फायब्रॉईन) बनवलेल्या विशेष ‘नॅनोकंपोझिट’ फिल्मचा वापर करून डेंग्यू पसरवणाऱ्या अळ्यांचा आणि कोषांचा (प्युपा) शंभर टक्के नायनाट करण्यात संशोधकांना यश आले आहे.

ज्येष्ठ नॅनो-तंत्रज्ञ डॉ. दिनेश अमळनेरकर आणि जुन्नर येथील प्राध्यापक डॉ. रवींद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे संशोधन केले असून, प्रसिद्ध ‘नेचर सायंटिफिक रिपोर्ट्स’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. Silk Nanocomposite Film for Dengue Control

१०० टक्के निर्मूलन

Silk Nanocomposite Film for Dengue Control रेशमाच्या प्रथिनांमध्ये चांदीचे नॅनोकण मिसळून तयार केलेल्या फिल्ममुळे डेंग्यू पसरवणाऱ्या ‘एडिस इजिप्ती’ डासांच्या अळ्या आणि कोष १०० टक्के नष्ट झाले. याच तंत्रज्ञानात सोन्याच्या नॅनोकणांचा वापर केला असता अळ्या नष्ट होण्याचे प्रमाण ८६ ते ९८ टक्के नोंदवले गेले. नॅनोकण थेट पाण्यात पसरू नयेत म्हणून ते रेशमाच्या जाळ्यात (मॅट्रिक्स) घट्ट बांधून ठेवले जातात. त्यामुळे पाण्यातील इतर जलचरांना किंवा माशांना कोणतीही हानी पोहोचत नसल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये दिसून आले.

पुण्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव

पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) दिलेल्या माहितीनुसार, शहरात यंदा डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पुणे महापालिका आरोग्य तपासणी आकडेवारीनुसार (१ जानेवारी ते २० ऑक्टोबर) डासांच्या अळ्या सापडलेले पाणीसाठे, बांधकाम साइट्स, कचऱ्याचे ढीग, कुंडीतील साचलेले पाणी आणि नळाचे पाणी साठवून ठेवण्याच्या टाक्या ही डासांच्या उत्पत्तीची मुख्य ठिकाणे बनली आहेत.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आरोग्य यंत्रणेला प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांना दर आठवड्याला कोरडा दिवस (ड्राय डे) पाळण्याचे आणि पाण्याचे साठे झाकून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
हे संशोधन सध्या प्रयोगशाळेच्या पातळीवर यशस्वी झाले आहे. सार्वजनिक वापरासाठी किंवा महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर वापरण्यापूर्वी याचे परीक्षण, दीर्घकालीन पर्यावरणीय सुरक्षितता आणि खर्च यांचा विचार करून पुढील संशोधन केले जाईल. Silk Nanocomposite Film for Dengue Control

Read About : Claude AI Drug Discovery – ॲलर्जीवरील उपचारासाठी क्लाऊडने तयार केली 35 हजार अँटीबॉडी डिझाइन्स!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.