Ad Advertisement Ad Advertisement

पर्यटनाची नवी लाट – One Day Trips Maharashtra

एकदिवसीय सहलींमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल;सर्चमध्ये तब्बल १,६०० टक्क्यांची उसळी!

नवी दिल्ली : One Day Trips Maharashtra २०२६ साठी पर्यटनाची नवी लाट आली आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळांची केवळ यादी पूर्ण करण्यापलीकडे जाऊन आता भारतीय पर्यटक मानसिक शांतता, आरोग्य आणि वैयक्तिक आवडीनिवडींवर आधारित प्रवासाला प्राधान्य देत आहेत. गेल्या वर्षभरात गूगलवर ‘वेलनेस ट्रॅव्हल इंडिया’ या शब्दाचा शोध तब्बल १,६०० टक्क्यांनी, तर ‘फिटनेस ट्रिप’चा शोध ९५० टक्क्यांनी वाढल्याचे ‘गूगल ट्रेंड्स’च्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. धकाधकीच्या जीवनशैलीतून बाहेर पडून निवांत वेळ घालवण्याकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. २०२६ साठी हीच खरी पर्यटनाची नवी लाट मानली जाते.

डिजिटल जगापासून दूर राहण्यासाठी शांत ठिकाणांचा शोध घेतल्याने ‘सायलेंट रिट्रीट’ सर्चमध्ये १५० टक्के वाढ झाली आहे, तर ‘स्लो ट्रॅव्हल म्हणजे काय?’ हा प्रश्न ट्रेंडिंगमध्ये राहिला आहे. गर्दीच्या ठिकाणांऐवजी अनवट आणि लपलेली सुंदर ठिकाणे शोधण्यासाठी ‘हिडन जेम्स इंडिया’ या सर्चमध्ये ४०० टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

एकट्याने प्रवास, ट्रॅव्हल कम्युनिटीची सोबत

२०२६ मध्ये स्वतंत्रपणे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून ‘सोलो ट्रॅव्हल गाईड’, ‘सोलो ट्रॅव्हलसाठी सर्वोत्तम ठिकाणे’ आणि ‘भारतातील सोलो ट्रॅव्हलचा खर्च’ हे विषय सर्वाधिक शोधले गेले आहेत. विशेष म्हणजे, एकट्याने प्रवास करतानाही समविचारी लोकांशी जोडले जाण्याची इच्छा वाढल्याने ‘ट्रॅव्हल कम्युनिटी’ या सर्चमध्ये ४०० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

एकदिवसीय सहलींमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

कमी कालावधीच्या सुट्ट्यांमध्ये जवळच्या ठिकाणी जाण्याला पर्यटकांनी मोठी पसंती दिली आहे:

महाराष्ट्रात सर्वाधिक क्रेझ : देशभरात ‘वन डे ट्रिप निअर मी’ या सर्चमध्ये गेल्या वर्षभरात १३० टक्के वाढ झाली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात अव्वल ठरले आहे.

निसर्ग आणि मनोरंजन : ट्रेकिंगचे मार्ग आणि संगीत महोत्सवांभोवती सहलींचे नियोजन करण्याचा ट्रेंड यंदा जोरात राहिला.

राहण्याच्या पसंतीत बदल

प्रवासादरम्यान आपल्या गरजेनुसार निवासाची निवड करण्याकडे कल वाढला असून ‘पेट-फ्रेंडली हॉटेल्स’ (पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल), ‘परवडणारे होमस्टे’ आणि ‘फॅमिली-फ्रेंडली डेस्टिनेशन्स’ यांना मोठी मागणी राहिली आहे. याशिवाय, सोशल मीडियावरील माहितीचे प्रत्यक्ष प्रवासाच्या वेळापत्रकात रूपांतर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात असून, ‘एआय फॉर ट्रॅव्हल’ या सर्चमध्ये गेल्या वर्षभरात ६०० टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे.


Read About : GBS in Kolhapur : कोल्हापुरात GBS चा धोका! 11 वर्षीय मुलाचा मृत्यू; 7 संशयित रुग्ण

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.