Ad Advertisement Ad Advertisement

Parbhani tenant murder क्षुल्लक कारणावरून परभणीत भाडेकरू तरूणाचा खून

चाकुने गुप्तांगावर केले वार, घरमालकासह चौघांवर गुन्हा

Parbhani tenant murder परभणी : कुलर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून भाडेकरू युवकाने वडिलांवर संताप व्यक्त करीत घरात शिवीगाळ सुरू केल्याने या शिव्यांना वैतागलेल्या घरमालकाने युवकास घराबाहेर ओढून त्याच्यावर चाकूने वार करून जिवे मारल्याची घटना शहरातील गंगाखेड रोडवरील बागवान गल्लीच्या फारूक कॉलनीत सोमवारी (दि.२) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव इरफान खान हबीब खान (वय ३१ रा. फारूक कॉलनी, बागवान गल्ली, गंगाखेड रोड परभणी) असे आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरमालकासह चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मृत तरुणाची आई शमा खान हबीब खान यांनी पोलीस ठाण्यास दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शमा खान या पती हबीब खान आणि तीन मुलांसह शेख लतीफ यांच्या घरात भाड्याने राहतात. सोमवारी (दि.२) रात्री ११.३० वाजता त्याचा मुलगा इरफान कामावरून घरी आला. घरात गरम होत असल्याने त्याने आईला कुलर लावायला सांगितले. कुलरची पट्टी तुटलेली असल्याने लावता येत नसल्याचे आईने सांगताच इरफानने वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या शिवीगाळचा आवाज ऐकून शेजारी राहणारे घरमालक शेख लतीफ व त्याची तीन मुले फिर्यादी शमा खान यांच्या खोलीत घुसले.

यावेळी लतीफ यांनी ‘तू नेहमीच जोरजोरात शिवीगाळ करतो, आमच्या घरात आई-बहिणी आहेत’ असे म्हणत त्यांनी इरफान आणि त्याच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘मेरा घर अभी खाली करो’ असे म्हणत शेख लतीफने इरफानला मानेला धरून घराबाहेर ओढले. बाहेर आल्यानंतर लतीफने मुलगा इमरानला ‘काय बघतोस माझ्याकडे’ असे म्हणताच एजाजने कंबरेला लपवलेला धारदार चाकू काढून इरफानच्या गुप्तांगावर वार केला. यात इरफान रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला.

अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू

जखमी इरफानला त्याचा भाऊ सोहेल आणि मित्र मोबीन यांनी तातडीने शासकीय रुग्णालय आणि नंतर परभणी येथील खासगी आयसीयूमध्ये दाखल केले. परंतु अतिरक्तस्त्राव झाल्याने मंगळवारी (दि.३) पहाटे ४.३० वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर माहितीवरून शेख लतीफ शेख यासीन (घरमालक), शेख एजाज शेख लतीफ, शेख साबेर शेख लतीफ, शेख बब्बू शेख लतीफ यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं ५३४/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ११५ (२), २९६, ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read About : Wildlife Water Scarcity in Marathwada – जंगलातील पाणवठे आटण्याच्या मार्गावर, मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होणार ?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.