Ad Advertisement Ad Advertisement

Roadways Bus Driver Assault : बसचालकाला बेदम मारहाण; ३ आरोपी २४ तासांत अटकेत

वाहन बाजूला घेण्याच्या किरकोळ कारणावरून वाद; चालकाला बसमधून फरफटत नेऊन मारहाण

उधम सिंग नगर : Roadways Bus Driver Assault उत्तराखंडमधील उधम सिंग नगर जिल्ह्यातील पुलभट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सरकारी बस चालकाला झालेल्या बेदम मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी चोवीस तासांच्या आत कारवाई केली आहे. पोलिसांनी तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली होती. रस्त्यावर उभे असलेले एक वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याच्या अगदी किरकोळ कारणावरून काही टवाळखोरांनी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, या टवाळखोरांनी थेट रोडवेज बसमध्ये घुसून चालकाला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी चालकाला बसमधून फरफटत रस्त्यावर ओढत आणले आणि पुन्हा अमानुषपणे मारले. भररस्त्यात सरकारी कर्मचाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेनंतर पुलभट्टा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी सकाळीच या प्रकरणात सामील असलेल्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. सैफ खान (वय २३ वर्षे), सावेज खान (वय २४ वर्षे) आणि रिझवान (वय २७ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, हे तिघेही व्यवसायाने ट्रक चालक आहेत.

Read About : Engineer Robbed in CSN – तुझ्याकडे ड्रग्स आहे म्हणत चाकूच्या धाकावर अभियंत्याला लुटले!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.