Ad Advertisement Ad Advertisement

Shrirampur Dumper Accident : भरधाव डंपरची स्कूटीला धडक; बोनेट पकडून तरुणीने वाचवला जीव

श्रीरामपूरच्या बेलापूर रोडवर थरारक अपघात; CCTV व्हिडिओ व्हायरल

श्रीरामपूर – Shrirampur Dumper Accident शहरातील बेलापूर रोडवरील वॉर्ड क्रमांक ७ परिसरात एका विनापरवाना धावणाऱ्या भरधाव वाळूच्या डंपरने स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटी डंपरखाली चिरडली गेली, मात्र स्कुटीवरील तरुणीने प्रसंगावधान राखत थेट डंपरचे बोनेट (बंपर) घट्ट पकडून ठेवल्याने तिचा जीव वाचला. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर शहरालगतच्या रस्त्यावरून एक तरुणी तिच्या स्कुटीवरून जात होती. त्याच वेळी एका वळणावर वाळू वाहतूक करणारा एक अवजड डंपर वेगात आला. डंपर चालकाचे समोरून येणाऱ्या तरुणीच्या स्कुटीला थेट उडवले. धडकेमुळे तरुणी हवेत फेकली गेली आणि तिची दुचाकी डंपरच्या चाकाखाली आली. मात्र, अशा क्षणीही तरुणीने अजिबात धीर सोडला नाही. तिने मोठ्या शिताफीने डंपरच्या पुढील भागाचा (बोनेटचा) आधार घेत स्वतःला लटकवून ठेवले, ज्यामुळे ती चाकाखाली येण्यापासून बचावली.

अपघातानंतर डंपर थांबताच मदतीचा हात देण्याऐवजी उलट डंपर चालकाने पीडित तरुणीशीच हुज्जत घालण्याचा आणि वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपघाताचे गांभीर्य पाहून आजूबाजूचे स्थानिक नागरिक आणि दुकानदार तात्काळ तरुणीच्या मदतीसाठी धावून आले. नागरिकांचा संताप आणि गर्दी वाढलेली पाहून डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा डंपर वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील वाळू लिलावातील असून, या वाहनाला कोणतीही नंबरप्लेट नव्हती.

Read About : Firozabad Firing : पतीकडून पत्नी आणि प्रियकरावर गोळीबार; दोघे गंभीर

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.