सध्या उद्यानात आहेत ८ वाघ : ब्रीडिंग करून वाघांची संख्या वाढविणार
छत्रपती संभाजीनगर : Siddharth Zoo Tiger Death सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील ‘सिद्धार्थ’ नावाच्या १७ वर्षे वयाच्या वयोवृद्ध वाघाचा गुरुवारी (दि.२९) रात्री नऊ वाजता मृत्यू झाला. या वाघाचा उद्यानातच जन्म झाल्याने, त्याचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले होते., अशी आठवणही यावेळी कर्मचाऱ्यांनी काढल्या.
सिद्धार्थ वाघाच्या मागील काही दिवसांपासून शारीरिक हालचाली मंदावल्या होत्या. त्याने अन्नग्रहण करणेही कमी केले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत होता. प्राणीसंग्रहालयाच्या पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले होते. वाघाने अन्न खाणे सोडून दिल्याने त्याला सलाईन, आवश्यक प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) आणि टॉनिकची इंजेक्शन्स देऊन वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, वयोमानामुळे त्याने या उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि अखेर त्याचे निधन झाले. साधारणपणे प्राणीसंग्रहालयातील वाघांचे सरासरी आयुर्मान हे १६ ते १८ वर्षे इतके असते., प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी अनंत जाधव यांनी सांगितले.
खडकेश्वर येथील जिल्हा पशु चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ.आर.डी. इंगळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबा जमाल, डॉ. एम. जे. तळेकर, डॉ. जे.एस. भगत, डॉ. गजानन चव्हाण आदींच्या पथकाने वाघाचे शवविच्छेदन केले. सिद्धार्थवर शुक्रवारी सकाळी उद्यानातच अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थवर शुक्रवारी (दि.३०) सकाळी उद्यानातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर वन विभागाचे वनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, उप वनसंरक्षक सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक आशा चव्हाण, वनपाल अविनाश राठोड, वनरक्षक डी.एस. पवार यांच्या उपस्थितीत पंचनामा करून वाघाला अग्नीडाग (अंत्यसंस्कार) देण्यात आला.
वर्षभरात दोन वाघ, एका सिंहिणीचा मृत्यू
सिद्धार्थ उद्यानातील पोषक वातावरणामुळे वाघांची संख्या वाढली होती. त्यामुळे कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाला तीन वाघ देण्यात आले, त्याबदल्यात २ सिंह, दोन अस्वल आणि २ कोल्हे घेण्यात आले होते. तर वर्षभरात सिद्धार्थमधील समृद्धी वाघीण, सुचित्रा सिंहिणीचा मृत्यू झालेला आहे. गुरुवारी रात्री सिद्धार्थ वाघाचा मृत्यू झाला. त्यामुळे उद्यानातील वाघांची संख्या आता घटली आहे.
सध्या आहेत ८ वाघ
सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात आता ८ वाघ आहेत. यात ४ पिवळ्या रंगाचे व चार पांढरे वाघ आहेत. पिवळ्या वाघांमध्ये १ नर आणि ३ माद्या आहेत. तरा पांढऱ्या वाघांमध्ये दोन नर व दोन माद्या आहेत. हे सर्व वाघ ५ ते ८ वयोगटातील आहेत. त्यामुळे आता पुन्हा वाघांचे ब्रीडिंग करण्याचे नियोजन करण्यात येईल., अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Read About : Hungry Ghost Festival : भुकेल्या भुतांचा उत्सव
E-Paper : Punyanagari E-Paperस्पेशल फीचर


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.