Ad Advertisement Ad Advertisement

Udta Teer release date – आयुष्मान-साराचा ‘उडता तीर’ दोन आठवडे लांबला

आता ९ नव्हे, २३ ऑक्टोबरला झळकणार

मुंबई : Udta Teer release date – आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्या ‘उडता तीर’ या चित्रपटाचा प्रदर्शन दिनांक बदलण्यात आली आहे. हा चित्रपट आधी ९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता. आता तो २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

दोन आठवडे पुढे लांबला

‘उडता तीर’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा प्रदर्शन दिनांक तब्बल दोन आठवड्यांनी पुढे ढकलला आहे. यामागे चित्रपटगृहातील प्रदर्शनाची गर्दी हे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. निर्मात्यांना चित्रपटाला चांगला स्क्रीन स्पेस आणि प्रेक्षकांसाठी मोकळा रिलीज वीकेंड मिळावा, अशी अपेक्षा आहे. आता हा चित्रपट २३ ऑक्टोबरच्या वीकेंडला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आयुष्मानसोबत दिग्गज कलाकार

या सिनेमात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत सारा अली खान, गुलशन ग्रोव्हर, मुकुल देव आणि राम कपूर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे नाव आणि प्रमोशनल कंटेंट समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आयुष्मान पुन्हा एका वेगळ्शा भूमिकेत दिसणार असल्याचेही सांगितले जात आहे.

आता २३ ऑक्टोबरची वाट पाहावी लागणार

प्रदर्शन दिनांक पुढे गेल्यामुळे निर्मात्यांना प्रमोशनसाठी आणखी वेळ मिळणार आहे. येत्या दिवसांत चित्रपटाचे प्रमोशन अधिक वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे. आता ९ ऑक्टोबरऐवजी २३ ऑक्टोबरला ‘उडता तीर’ चित्रपटगृहात झळकणार आहे. त्यामुळे आयुष्मान आणि सारा यांच्या चाहत्यांना या सिनेमासाठी आणखी दोन आठवडे वाट पाहावी लागणार आहे.

Read About : Bakaiti Season 3 – ‘बकैती’ सीझन 3 येणार का? दुसरा सीझन संपला
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.