तिच्या मणक्याला फ्रॅक्चर, सर्जरीची तयारी
बाली : Nushrratt Bharuccha spine fracture – बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिच्याबाबत मोठी आणि चिंताजनक माहिती प्राप्त झाली आहे. बालीमध्ये सुट्टीसोबत कामाची ट्रिप एन्जॉय करत असताना नुसरतचा अपघात झाला. या अपघातात तिच्या मणक्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती तिच्या टीमने अधिकृतपणे दिली आहे. अपघातानंतर नुसरतला बालीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. तपासणीनंतर तिच्यावर स्पाइन सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईत आणणार
नुसरतला पुढील उपचारांसाठी बालीहून मुंबईत आणल्यानंतर तिची स्पाइन सर्जरी करण्यात येणार असल्याचे तिच्या टीमने सांगितले आहे.
सध्या नुसरतच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. शस्त्रक्रियेनंतर तिला काही काळ पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तिच्या आगामी कामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
अचानक सगळं बदललं..
नुसरत काही दिवसांपूर्वीच बालीला गेली होती. काम आणि सुट्टी अशा दोन्ही कारणांसाठी हा प्रवास होता. मात्र, या प्रवासादरम्यान झालेल्या अपघातामुळे तिच्या पुढील काही आठवड्यांचे कामाचे वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे.
नुसरत लवकरच रेमो डिसूझा यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ, पश्मिना रोशन, एल्विश यादव आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही भूमिका आहेत. मात्र, सध्या चित्रपटापेक्षा नुसरतच्या आरोग्याला अधिक महत्त्व देण्यात येत आहे.
चाहत्यांना टीमचा खास मेसेज
नुसरतच्या टीमने चाहत्यांना आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना एक खास विनंती केली आहे. तिच्या उपचाराच्या काळात तिच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि तिला शांतपणे सावरण्यासाठी वेळ द्या, असे टीमने म्हटले आहे.
नुसरतच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती योग्य वेळी दिली जाईल, असेही टीमने स्पष्ट केले आहे. सध्या बॉलिवूडमधील या अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या नजरा तिच्या पुढील मेडिकल अपडेटकडे लागल्या आहेत. नुसरत लवकर बरी होऊन पुन्हा आपल्या कामाकडे परतावी, हीच तिच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
Read About : Bakaiti Season 3 – ‘बकैती’ सीझन 3 येणार का? दुसरा सीझन संपला
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.