Ad Advertisement Ad Advertisement

Ultimate Smile AI : आता दंतवैद्याकडे जाण्यापूर्वीच पाहा तुमचे भविष्यातील हास्य; अवघ्या 10 सेकंदांत मिळणार स्माईल प्रिव्ह्यू

व्हेनियर्स, टीथ व्हाइटनिंग आणि क्लिअर ॲलाइनर्ससह विविध उपचारांची डिजिटल झलक पाहण्याची सुविधा

नवी दिल्ली : Ultimate Smile AI दंतवैद्याकडे प्रत्यक्ष न जाता आपल्या चेहऱ्यावर भविष्यात कोणते आणि कसे हास्य खुलून दिसेल, हे आता घरी बसल्या अवघ्या १० सेकंदांत पाहणे शक्य झाले आहे. सुरत येथील ॲडव्हान्स डेंटल एक्सपोर्टचा उपक्रम असलेल्या अल्टिमेट स्माईल डिझाइनने अल्टिमेट स्माईल एआय हे नवे तंत्रज्ञान सादर केले आहे. या एआय-आधारित व्हर्च्युअल टूलच्या मदतीने केवळ एका साध्या सेल्फीवरून आपल्या संभाव्य हास्याचे डिजिटल रूप पाहता येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हास्यात बदल घडवून आणण्यासाठी रुग्णांना जुने फोटो, संदर्भ किंवा दंतवैद्यांशी होणाऱ्या चर्चेवर अवलंबून राहावे लागत होते. उपचारानंतर आपल्या चेहऱ्यावर नवीन हास्य कसे दिसेल, याची कल्पना करणे कठीण जायचे. मात्र, अल्टिमेट स्माईल एआयने ही दरी दूर केली असून, कोणत्याही प्रक्रियेशिवाय किंवा अपॉइंटमेंटशिवाय घरबसल्या हास्याचा प्रिव्ह्यू पाहणे आता सहज शक्य झाले आहे.

कसे काम करते अल्टिमेट स्माईल एआय?

हे तंत्रज्ञान वापरण्यास अतिशय सोपे आहे. वापरकर्त्यांनी अल्टिमेट स्माईल डिझाइनच्या वेबसाइटवर जाऊन कॅमेऱ्याला परवानगी द्यायची आहे. चेहरा स्क्रीनच्या मध्यभागी आणि स्पष्ट प्रकाशात ठेवून नैसर्गिक हास्य देत कॅप्चर नाऊ बटण दाबल्यानंतर एआय चेहऱ्याची ठेवण, दातांचे प्रमाण आणि ओठांची रेषा यांचे विश्लेषण करते. अवघ्या १० सेकंदात भविष्यातील संभाव्य हास्याची डिजिटल प्रतिकृती स्क्रीनवर तयार होते. त्यानंतर वापरकर्ते आपल्या शहरातील अधिकृत अल्टिमेट स्माईल डिझायनरची भेट घेऊन पुढील उपचारांचे नियोजन करू शकतात.

साध्या फिल्टरपेक्षा वेगळे आणि शास्त्रीय तंत्रज्ञान

सोशल मीडियावरील सामान्य फिल्टर केवळ दातांचा रंग बदलतात, मात्र अल्टिमेट स्माईल एआय हे दंत सौंदर्यशास्त्राच्या नियमांवर आधारित आहे. यामध्ये दातांचे प्रमाण, समतोल आणि चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांनुसार विविध उपचार पर्यायांची झलक पाहता येते.

स्माईल प्रिव्ह्यूत या गोष्टींचा आहे समावेश

टिथ व्हाइटनिंग : अधिक शुभ्र आणि चमकदार हास्य कसे दिसेल याचा अंदाज

व्हेनियर्स आणि लॅमिनेट्स : दातांचा आकार आणि रचनेतील संभाव्य बदलांची झलक

कंपोझिट बाँडिंग : दातांच्या रचनेत सूक्ष्म बदल केल्यास हास्य कसे दिसेल याचे चित्र

क्लिअर ॲलाइनर्स : दात सरळ झाल्यानंतर चेहरा कसा दिसेल याचा संदर्भ

कम्प्रिहेन्सिव्ह स्माईल मेकओव्हर : संपूर्ण हास्याच्या कायापालटाची शक्यता

एआय प्रिव्ह्यू आणि प्रत्यक्ष वैद्यकीय उपचार

एआयद्वारे तयार झालेला प्रिव्ह्यू हा संभाव्य बदलांची कल्पना देणारे एक प्रभावी माध्यम आहे, मात्र तो उपचारांचा अंतिम निकाल मानला जाऊ नये, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. फोटोची गुणवत्ता आणि प्रकाशयोजनेवर प्रिव्ह्यू अवलंबून असतो. प्रत्यक्ष उपचारांसाठी दातांचे आरोग्य, हिरड्यांची स्थिती आणि जबड्याची रचना यांची दंतवैद्यांकडून प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असते.

तंत्रज्ञान आणि वैयक्तिक कौशल्याचा संगम

सुरत येथील ॲडव्हान्स डेंटल एक्सपोर्ट या संस्थेचे संस्थापक हरेश सवानी यांनी अल्टिमेट स्माईल डिझाइन ही संकल्पना मांडली आहे. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा आणि व्यक्तिमत्त्व वेगळे असते, त्यामुळे प्रत्येकासाठी एकच प्रकारचे हास्य शोभून दिसत नाही. एआय तंत्रज्ञान केवळ संभाव्य हास्य दाखवण्यास मदत करते, तर प्रमाणित स्माईल डिझायनर दंतवैद्य आणि कुशल तंत्रज्ञ आपल्या कौशल्याने त्या हास्याला प्रत्यक्षात साकारतात.

Read About : Bengaluru Smoking Ban – बंगळुरूत हॉटेल, पब, बारमध्ये धूम्रपानबंदीचा प्रस्ताव
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.