Ad Advertisement Ad Advertisement

NonTeaching Staff Strike Maharashtra 2026 – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राज्यभर काम बंद आंदोलन

२६ नोव्हेंबरला विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील कर्मचारी सहभागी होणार
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार

छत्रपती संभाजीनगर : NonTeaching Staff Strike Maharashtra – राज्यातील विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबरला एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनात राज्यातील सर्व विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयुक्त कृती समितीने केले आहे. आंदोलनाच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी नियमित कार्यालयीन कामकाजात सहभागी न होता संस्थेच्या परिसरात एकत्र येऊन शांततामय मार्गाने आंदोलन करावे, अशा सूचना स्थानिक कर्मचारी संघटनांना देण्यात आल्या आहेत. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन उपस्थिती नोंदवू नये, तर स्थानिक संघटनांच्या स्वतंत्र नोंदवहीत उपस्थिती नोंदवावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

आंदोलन शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने पार पाडण्याची जबाबदारी स्थानिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवांना आंदोलनाची पूर्वसूचना देण्यात आली आहे. हे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अजय देशमुख, मिलिंद भोसले, दिनेश दखने, रावसाहेब त्रिभुवन, आनंदराव खामकर, माधव राऊळ यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Read About : Ugc Net December 2026 Exam – यूजीसी नेटचा बिगुल वाजला!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.