Ad Advertisement Ad Advertisement

US Global Warming : तापमानवाढीसाठी अमेरिका सर्वाधिक जबाबदार; UN अहवालाचा इशारा

हवामान बदल रोखण्यात जगाची पीछेहाट; २०२५ मधील जागतिक उत्सर्जनवाढीपैकी ७० टक्के वाटा अमेरिकेचा असल्याचा अहवालात दावा

वॉशिंग्टन : US Global Warming हवामान बदलाच्या समस्येशी लढण्यात जगाची दिवसेंदिवस पीछेहाट होत असून पृथ्वीचे तापमान पूर्वीच्या अंदाजांपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने (यूएन) जाहीर केलेल्या एका नव्या अहवालात या परिस्थितीला मुख्यत्वे अमेरिका कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमच्या (यूएनईपी) नव्या अहवालानुसार, जर जगातील सर्व देशांनी उष्णता वाढवणारे उत्सर्जन (ग्रीनहाऊन इमिशन) कमी करण्याचे दिलेले आश्वासन पाळले, तरीही पृथ्वीचे तापमान सध्याच्या पातळीपेक्षा १.२ अंश सेल्सिअसने वाढेल. हा दर गेल्या वर्षी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा सुमारे ०.०२ अंश सेल्सिअसने जास्त आहे.

अमेरिकेचा पॅरिस करारातून काढता पाय

अहवालात नमूद केल्यानुसार, अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून अधिकृतपणे घेतलेली माघार आणि त्यांचे वाढते उत्सर्जन यामुळे ही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

उत्सर्जनाचा मोठा वाटा

जगभरातील जी-२० देशांपैकी बहुतांश देशांनी कोळसा, तेल आणि वायूच्या वापरामुळे होणारे प्रदूषण कमी केले किंवा त्याचा वेग मंदावला. मात्र, अमेरिकेत विजेची मागणी वाढल्यामुळे आणि कोळशावर आधारित ऊर्जेचा वापर पुन्हा वाढल्यामुळे उत्सर्जनाचा आलेख झपाट्याने वर गेला.

७० टक्के वाढ एकट्या अमेरिकेतून

Climate Change Report, UNEP Report 2026, Global Warming २०२५ मध्ये उत्सर्जन वाढवणाऱ्या १२४ देशांनी वातावरणात १८९ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड जोडला. या एकूण वाढीपैकी तब्बल ७० टक्के वाढ (१३३ मेगाटन) एकट्या अमेरिकेतून झाली आहे.

अंदाजांपेक्षा किती पटीने जास्त तापमान वाढणार?

२०१५ च्या पॅरिस करारात जागतिक तापमान वाढ १.५ ते २ अंश सेल्सिअसच्या आत मर्यादित ठेवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. सध्या पृथ्वीचे तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळापेक्षा आधीच १.४ अंश सेल्सिअसने जास्त आहे. देशांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली, तरी सन २१०० पर्यंत जागतिक तापमान २.६ अंश सेल्सिअसने वाढेल. तर कोणतीही पावले न उचलल्यास हे तापमान २.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. १.५ अंश सेल्सिअसची मर्यादा थेट पाळणे आता शक्य उरलेले नाही. भविष्यात हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन तापमान पुन्हा खाली आणण्याचा एकमेव मार्ग आता उरला आहे, असे युएनच्या अधिकाऱ्यांनी आता हे मान्य केले आहे.

वाढत्या तापमानाचा भीषण परिणाम

Climate Change Report, UNEP Report 2026, Global Warming हवामान तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या भूमिकेमुळे तापमानात होणारी अवघी ०.१ अंश सेल्सिअसची वाढ देखील मानवासाठी अत्यंत विनाशकारी ठरू शकते. त्यामुळे आणखी १४ कोटी लोक उष्णतेच्या भीषण लाटांचा सामना करतील. अमेझॉनचे जंगल आणि ग्रीनलँड तसेच अंटार्क्टिकामधील बर्फाच्छादित प्रदेश वितळण्याचा धोका कैक पटीने वाढेल. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला सुमारे १.२ ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसू शकतो.

वातावरण आटोक्यात ठेवण्यासाठी जागतिक कार्बन उत्सर्जनामध्ये २०३० पर्यंत १८ टक्के आणि २०४० पर्यंत ६९ टक्के कपात करणे हाच एकमेव मार्ग उरला आहे.

  • इंगर अँडरसन, संचालक, यूएनईपी

Read About : Human Hair Bioethanol : मानवी केसांपासून तयार होणार इंधन; आत्ताच वाचा महत्त्वपूर्ण संशोधन
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.