Ad Advertisement Ad Advertisement

Zed Black Diwali Campaign – प्रीमियम उत्पादनांसह झेड ब्लॅकचा फेस्टिव्ह पोर्टफोलिओ विस्तार

एमएस धोनी झळकणार नव्या दिवाळी जाहिरातीत!

इंदूर : Zed Black Diwali Campaign दिवाळी आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अगरबत्ती आणि पूजासाहित्य क्षेत्रातील ‘झेड ब्लॅक’ या ब्रँडने आपल्या उत्पादनांची श्रेणी विस्तारली आहे. ‘म्हैसूर डीप परफ्युमरी हाऊस’ (एमडीपीएच) या कंपनीने अगरबत्ती, धूप, कापूर आणि पूजेसाठी आवश्यक वस्तूंच्या नव्या प्रकारांसह प्रीमियम उत्पादनांवर भर दिला आहे. यासोबतच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनी याला घेऊन ‘प्रार्थना होगी स्वीकार’ या मोहिमेअंतर्गत नवी दिवाळी जाहिरातही सादर करण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, यंदाच्या सणासुदीच्या काळात एकूण विक्रीपैकी सुमारे ४० टक्के विक्री होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन विविध सुगंध, आकर्षक पॅकिंग आणि वेगवेगळ्या आकारांतील उत्पादनांची उपलब्धता वाढवण्यात आली आहे.

धोनीसोबतच्या सहकार्याला दहा वर्षे पूर्ण

झेड ब्लॅकच्या ‘प्रार्थना होगी स्वीकार’ या जाहिरात मोहिमेला यंदा विशेष महत्त्व आहे. ब्रँड अॅम्बेसेडर एम. एस. धोनी याच्यासोबतच्या सहकार्याला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. ‘एक नये कल की उम्मीद’ या संकल्पनेवर आधारित जाहिरातीत प्रार्थना, आशा आणि उज्ज्वल भविष्याची अपेक्षा यांचा संदेश देण्यात आला आहे. याशिवाय, झेड ब्लॅकने ‘कौन बनेगा करोडपती’च्या १८व्या पर्वाशी सहयोग केला असून, या कार्यक्रमासाठी सहयोगी प्रायोजक आणि भेटवस्तू भागीदार म्हणूनही ब्रँड सहभागी झाला आहे.

अगरबत्ती आणि धूप उत्पादनांमध्ये नवे प्रकार
  • उत्पादनांच्या विस्तारामध्ये प्रीमियम अगरबत्ती आणि धूप यांना विशेष स्थान देण्यात आले आहे. गुलाब, मोगरा आणि चंदन या सुगंधांतील रंगीत अगरबत्ती जार पॅकिंगमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच रंगीत धूपकांड्या आणि धूपकोन मोठ्या जारमध्ये सादर करण्यात आले आहेत.
  • ‘समृद्धी’ या प्रीमियम श्रेणीत फुलांच्या सुगंधावर आधारित अगरबत्तींचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय १९ इंच लांबीच्या आणि जाड अगरबत्त्यांची ‘फॅब सिरीज’ तसेच सहा प्रकारांचा समावेश असलेली ‘इंडियन ओशन सिरीज’ बाजारात आणण्यात आली आहे.
  • ‘नेचर ब्लिस’ या उत्पादनात कापूर, कस्तुरी आणि गुग्गुळ या सुगंधांचे मिश्रण देण्यात आले आहे. तर ‘समर्पण प्युअर कापूर’ नव्या कॅप्सूल आकाराच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.
धूप उत्पादनांमध्येही विस्तार

धूप उत्पादनांची श्रेणी वाढवताना ग्राहकांच्या विविध पसंतींचा विचार करण्यात आला आहे. धोनीच्या नावाने उपलब्ध असलेल्या प्रीमियम धूप श्रेणीत कस्तुरी, लोबान, अननस आणि कच्च्या बेलासह आठ सुगंधांचा समावेश असल्याचे कंपनीने सांगितले. याशिवाय ‘धोनी ३-इन-१’ ही श्रेणीही उपलब्ध आहे.

प्रादेशिक पूजापद्धतीनुसार उत्पादनांची उपलब्धता
  • भारतातील विविध राज्यांमध्ये पूजाविधी आणि सुगंधांची आवड वेगवेगळी असल्याने कंपनीने ‘समर्पण’ ब्रँडअंतर्गत प्रादेशिक उत्पादनांवरही लक्ष केंद्रित केले आहे. सिंदूर, शुद्ध कापूर, भीमसेनी कापूर आणि सांब्राणी यांसारख्या उत्पादनांचा या श्रेणीत समावेश आहे.
  • पश्चिम बंगालमधील ग्राहकांसाठी धुना क्रिस्टल्स, लोबान क्रिस्टल्स आणि टॅब्लेट्स, धुना पावडर तसेच पवित्र धुना ही उत्पादने उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यासोबत गुलाब, मोगरा आणि चंदन सुगंधातील झेड ब्लॅक अगरबत्तीचे पर्यायही देण्यात आले आहेत.
  • एमडीपीएचचे व्यवस्थापकीय भागीदार आणि संचालक अंकित अग्रवाल यांच्या मते, सणासुदीचा काळ हा प्रार्थना आणि सुगंधाशी संबंधित उत्पादनांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे ग्राहकांच्या गरजेनुसार विविध सुगंध, पॅकिंग आणि उत्पादनांचे पर्याय उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर आहे.
४० देशांमध्ये कंपनीची निर्यात

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला स्थापन झालेली म्हैसूर डीप परफ्युमरी हाऊस ही भारतीय कंपनी सुगंधी उत्पादने, अगरबत्ती आणि ग्राहक उत्पादनांची निर्मिती व निर्यात करते. कंपनीच्या माहितीनुसार, तिची उत्पादने ४० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात.

इंदूर येथे कंपनीचा सुमारे ९.४ लाख चौरस फुटांचा उत्पादन प्रकल्प असून, दररोज सुमारे ३.५ कोटी अगरबत्त्यांचे उत्पादन केले जाते. कंपनीत जवळपास चार हजार कर्मचारी कार्यरत असून, त्यापैकी सुमारे ८० टक्के महिला आहेत. झेड ब्लॅक, समर्पण, मंथन, ओरव्हा आणि ब्लंट ब्लॅक हे कंपनीचे प्रमुख ब्रँड आहेत. Zed Black Diwali Campaign

Read About : Venugopal Dhoot Declared Bankrupt- व्हिडीओकॉनचे माजी प्रवर्तक वेणुगोपाल धूत दिवाळखोर
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.