Ad Advertisement Ad Advertisement

40 JCB Diesel Shortage – डिझेलअभावी जलसंपदाचे 40 नवेकोरे जेसीबी थप्पीला

दुष्काळात तेरावा : प्रकल्प, कालवा दुरुस्तीसाठी कंत्राटदारांच्या झोळ्या भरण्याचा उद्योग

40 JCB Diesel Shortage छत्रपती संभाजीनगर : डिझेल खरेदीसाठी राज्य सरकारकडून गेल्या सात महिन्यांपासून निधी मिळणे बंद झाल्याने जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाचे ४० नवेकोरे जेसीबी यंत्रे थप्पीला लागली आहेत. केवळ डिझेलअभावी जेसीबी यंत्रे बंद असल्याने प्रकल्प, कालवा दुरुस्तीसाठी कंत्राटदाऱ्यांच्या यंत्रांचा वापर करून त्यांच्या झोळ्या भरण्याचा उद्योग जलसंपदा विभाग करीत आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ७३ व्या बैठकीत यांत्रिकी विभागासाठी नवीन ४० जेसीबी यंत्रे खरेदी करण्याचा ठराव मंजूर झाला होता. त्यानुसार ११ कोटी २४ लाख रुपये खर्च करून प्रत्येकी १० जेसीबी ८१ आणि जेसीबी बॅकहो लोडर, तर २० जेसीबी १४० अशा ४० यंत्रांची खरेदी करण्यात आली. यांत्रिकी विभागाच्या नांदेड, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयांना प्रत्येकी ८ ,तर संभाजीनगरच्या मुख्य द्वार पथक उभारणी पथक क्र.४ या कार्यालयास ८ अशा पद्धतीने या जेसीबींचे वितरण करण्याचे नियोजन होते.

यंत्रे ताब्यात घेण्यास नकार

राज्य सरकारकडून यांत्रिकी विभागास डिझेल खरेदीसाठी नियमितपणे निधी दिला जात असे. मात्र, एप्रिल २०२६ पासून हा निधी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यंत्रे चालविण्यासाठी इंधनाचा खर्च कसा करायचा? असा प्रश्न उपस्थित करून संभाजीनगर, धाराशिव, नांदेड व बीड येथील कार्यालयांनी जेसीबी स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी संभाजीनगरातील यांत्रिकी विभाग क्र. २ च्या कर्मशाळा परिसरात ही यंत्रे धूळखात पडून आहेत.

खासगी यंत्रसामग्रीचा सर्रास वापर
  • १) जलसपंदा विभागाकडून कालवा, प्रकल्प दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. जायकवाडी टप्पा २ अंतर्गत धरणाच्या डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत.
  • २) प्रकल्पांच्या देखभाल- दुरुस्तीसाठी यांत्रिकी विभागाच्याच यंत्रांचा वापर करणे अपेक्षित असताना ते टाळले जाते. यांत्रिकी विभागास मिळालेल्या ४० जेसीबींचा वापर करून कालवा, प्रकल्प दुरुस्तीसह नदी खोलीकरण, गाळ काढणे आदी कामे करता येणे शक्य होते.
  • ३) कालव्यांच्या दुरुस्तीअभावी पाणी आवर्तनात येणाऱ्या अडचणी दूर करता आल्या असत्या तसेच कालव्यातील गळतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळणे शक्य झाले असते. मात्र, केवळ इंधनासाठी पैसा नसल्याने ४० जेसीबी थप्पीला लावण्यात आल्या असून, कंत्राटदारांच्या यंत्रसामग्रीचा सर्रास वापर केला जात आहे.

Read About : Husband Suicide After Wife Affair – पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची सासरवाडीतच आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.