Luv Ranjan new film : लव रंजनच्या ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लूक २३ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
मुंबई: Pehla Pyaar Doosri Baar First Look: बॉलिवूडमध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निर्माता लव रंजन यांच्या आगामी ‘पहला प्यार दूसरी बार’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून तब्बल सहा नवे कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. मैत्री आणि कॉमेडीवर आधारित हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये सहाही कलाकार एकत्र दिसत आहेत. अलीशा चोप्रा, स्पर्श वालिया, साक्षी वैद्य, कुणाल वैद, सरगुन कौर लुथरा आणि तुषार छिब्बर अशी या नव्या कलाकारांची नावे आहेत. पोस्टरमध्ये त्यांचा उत्साही आणि मस्तीभरा अंदाज पाहायला मिळतो. त्यामुळे चित्रपटात तरुणाई, मैत्री आणि भरपूर मजा पाहायला मिळणार असल्याची झलक मिळते.
Six Bollywood newcomers : लव रंजन पुन्हा नव्या कलाकारांना संधी देणार
लव रंजन यांनी यापूवी ‘प्यार का पंचनामा’ मधून नव्या कलाकारांना मोठी संधी दिली होती. आता सुमारे १५ वर्षांनंतर ते पुन्हा सहा नव्या चेहऱ्यांना प्रेक्षकांसमोर आणत आहेत. नव्या कलाकारांसोबत काम करण्याबद्दल लव रंजन यांनी सांगितले की, नव्या कलाकारांना लॉन्च करणे हे आव्हानात्मक असले तरी त्यांना हे काम खूप आवडते. सहा नव्या कलाकारांसाठी एक वेगळी कथा आणि जग तयार करण्याचा अनुभव त्यांच्यासाठी खास असल्याचे त्यांनी सांगितले.
Pehla Pyaar Doosri Baar release date : नव्या दिग्दर्शकाचीही एन्ट्री
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनूज सैनी करत आहेत. विशेष म्हणजे हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. लव फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.
सहा नवे कलाकार, नवा दिग्दर्शक आणि मैत्री-कॉमेडीची मजेशीर कथा यामुळे ‘पहला प्यार दूसरी बार’ बद्दल उत्सुकता वाढली आहे. आता या सहा नव्या चेहऱ्यांची मोठ्या पडद्यावरची जादू प्रेक्षकांना किती आवडते, हे पाहणे रंजक ठरणार आहे. २३ ऑक्टोबरला या नव्या टीमची फिल्मी सफर सुरू होणार आहे.
Read About : Happy Journey trailer : सात महिला, सात कथा आणि एक भन्नाट प्रवास
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.