-स्वरा भास्करसह चार स्पर्धकांची नावे जाहीर
मुंबई : Rise And Fall Season 2 : टीव्हीवरील बहुचर्चित रिॲलिटी शो ‘राईज अँड फॉल’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या सीझनमधील चार प्रमुख स्पर्धकांची नावे एका प्रोमोद्वारे जाहीर करण्यात आली आहेत. मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांचा या शोमध्ये समावेश असणार आहे.
या सीझनमध्ये एकूण १५ स्पर्धक सहभागी होणार असून, जाहीर झालेल्या चार नावांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, टीव्ही अभिनेता करण पटेल, ‘बिग बॉस’ फेम प्रियांका चहर चौधरी आणि राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांचा समावेश आहे.
चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांसह राजकीय मंचावरील प्रसिद्ध चेहरा या शोमध्ये दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘राईज अँड फॉल’चा हा नवा सीझन पॉवर गेम आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील दिग्गजांच्या सहभागामुळे अधिक रंजक ठरणार आहे.
१५ स्पर्धक, चार नावे जाहीर
‘राईज अँड फॉल’च्या दुसऱ्या सीझनमध्ये एकूण १५ स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यापैकी स्वरा भास्कर, करण पटेल, प्रियांका चहर चौधरी आणि शहजाद पूनावाला या चार स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
मनोरंजनासोबत राजकीय चेहराही
‘राईज अँड फॉल’च्या नव्या सीझनमध्ये बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रातील कलाकारांसोबत राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध चेहराही सहभागी होणार आहे. त्यामुळे स्पर्धकांमधील रणनीती, पॉवर गेम आणि आव्हाने पाहणे रंजक ठरणार आहे.
Read About : Rashmika Mandanna Raaka : रश्मिका पुन्हा ‘राका’च्या सेटवर
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.