अल्लू अर्जुनसोबत चित्रिकरण सुरू, करण मेहताचीही चित्रपटात एन्ट्री
मुंबई : Rashmika Mandanna Raaka : अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा कामावर परतली आहे. दुखापतीमुळे काही काळ चित्रिकरणापासून दूर राहिल्यानंतर रश्मिकाने आता अल्लू अर्जुनच्या आगामी ‘राका’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. मुंबईत या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून रश्मिका आणि अल्लू अर्जुन पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
रश्मिकाला गेल्या महिन्यात एका गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान कंबरेला दुखापत झाली होती. त्यामुळे ‘राका’मधील तिचे चित्रिकरण पढे ढकलण्यात आले होते. आता ती बरी झाली असून तिने चित्रपटासाठी पुन्हा चित्रीकरण सुरू केले आहे. सध्या ती काही दिवस चित्रिकरण करणार असून पुढील महिन्यापासून तिचे पूर्ण वेळापत्रक सुरू होणार असल्याची माहिती आहे.
‘पुष्पा’नंतर जोडी पुन्हा एकत्र
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची जोडी ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा २’मुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता ही जोडी पुन्हा ‘राका’मध्ये एकत्र दिसणार आहे. चित्रपटात दोघांवर काही महत्त्वाची कृतीदृश्ये चित्रित केली जाणार असल्याची माहिती आहे.
करण मेहताचीही एन्ट्री
या चित्रपटात अभिनेता करण मेहताचीही एन्ट्री झाली आहे. त्याने २०२३ मध्ये ‘अल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ‘राका’मध्ये करण महत्त्वाची भूमिका साकारणार असून त्याने चित्रीकरण सुरू केले आहे.
दिग्गज कलाकारांची फौज
‘राका’मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिकासोबत दीपिका पदुकोण, मृणाल ठाकूर आणि जान्हवी कपूर यांच्याही भूमिका आहेत. राम्या कृष्णन, योगी बाबू आणि जिम सर्भ हे कलाकारही चित्रपटाचा भाग आहेत.
अटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. समांतर विश्वाच्या पार्श्वभूमीवर तयार होणारा हा मोठ्या प्रमाणातील कल्पनारम्य कृतीपट असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचे चित्रीकरण २०२७ च्या सुरुवातीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. २०२७च्या उत्तरार्धात ‘राका’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
Read About : Taapsee Pannu Gandhari OTT views : ‘गांधारी’चा ओटीटीवर धुमाकूळ
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.