Ad Advertisement Ad Advertisement

Water Battery Technology : 3 शतके टिकणारी पाण्याची बॅटरी, हाँगकाँगमधील क्रांतिकारी शोध ऊर्जा क्षेत्रासाठी ठरणार वरदान

१,२०,००० चार्ज-डिस्चार्ज सायकलची प्रयोगशाळेत चाचणी, सौर आणि पवन ऊर्जा साठवणुकीसाठी तंत्रज्ञानाचा संभाव्य उपयोग

बीजिंग : Water Battery Technology शास्त्रज्ञांनी पाण्यावर आधारित एक अत्यंत प्रगत आणि प्रायोगिक बॅटरी विकसित केली असून, तिचे आयुष्य तब्बल ३०० वर्षे असू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या प्रसद्धि नियतकालिकात हे संशोधन नुकतेच प्रसद्धि झाले आहे.

प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या बॅटरीने कोणतीही मोठी झीज न होता तब्बल १,२०,००० वेळा चार्ज आणि डस्चिार्ज होण्याचा वक्रिम केला आहे. सामान्य वापराचा विचार केल्यास ही बॅटरी मुख्य कार्यक्षमता न गमावता सुमारे ३०० वर्षे अविरत चालू शकते. सध्याच्या लिथियम-आयन बॅटऱ्यांमुळे आग लागण्याचा आणि पर्यावरणाला हानी पोहोचण्याचा मोठा धोका असतो. याउलट, नवी बॅटरी न्यूट्रल पीएच असलेल्या क्षारयुक्त पाण्यावर (टोफू ब्राईनसारखे मॅग्नेशियम क्लोराईड आणि कॅल्शियम सल्फेट द्रावण) आधारित असल्याने ती पेट घेत नाही आणि अतिशय सुरक्षित आहे. सिटी युनव्हिर्सिटी ऑफ हाँगकाँगच्या मटेरियल्स सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील डॉ. चुन्यी झी आणि डॉ. हॅमी ल्यू यांनी हे संशोधन केले आहे.

ही बॅटरी कशी काम करते?

या बॅटरीमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या दोन धातूंचे लहान कण (आयन्स) क्षारयुक्त पाण्यातून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जातात. यामुळे वीज तयार होते. साध्या पाण्यावर चालणाऱ्या इतर बॅटऱ्यांमध्ये तीव्र आम्ल किंवा अल्कली वापरले जाते, ज्यामुळे बॅटरीचे आतील भाग कालांतराने गंजतात आणि बॅटरी लवकर खराब होते. पण या नव्या बॅटरीत शास्त्रज्ञांनी दोन खास प्रकारचे पदार्थ वापरले आहेत. नकारात्मक बाजू : यात कोव्हॅलेंट ऑर्गेनिक पॉलिमर नावाचा एक विशेष पदार्थ वापरला आहे. याची रचना मधमाशीच्या पोळ्यासारखी असते. यामुळे हे पाणी आत शिरूनही हा भाग गंजत नाही आणि लहान कण सहजपणे पुढे-मागे जाऊ शकतात. सकारात्मक बाजू (कॅथोड) : यात प्रशियन ब्ल्यू अ­ॅनालॉग नावाचा स्फटिकासारखा पदार्थ वापरला आहे. हा पदार्थ लहान कणांना आपल्यामध्ये साठवून धरतो. या बॅटरीतील पाणी विषारी नाही आणि निसर्गात सहज मिसळून जाणारे आहे. त्यामुळे ही बॅटरी वापरायला सुरक्षित आहे आणि निकामी झाल्यावर तिची वल्हिेवाट लावणेही सोपे आहे.

मोठ्या ऊर्जा प्रकल्पांसाठी वरदान

ही बॅटरी तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपसाठी डिझाइन केलेली नाही. कमी जागेत जास्त ऊर्जा साठवण्याऐवजी दीर्घ आयुष्य, सुरक्षितता आणि शून्य देखभाल आवश्यक असणाऱ्या मोठ्या सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांतून तयार होणारी वीज साठवणुकीसाठी ही अत्यंत उपयुक्त ठरेल. भवष्यिात हे तंत्रज्ञान व्यावसायिक स्तरावर उपलब्ध झाल्यास बॅटरीचा कचरा आणि आगीचे धोके कायमचे संपुष्टात येतील.

Read About : Moon Colony Research 2026: चंद्रावर वसाहती उभारणे अशक्य? जलसाठे अपुरे, मानवी स्वप्न तूर्त आवाक्याबाहेर
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Loading comments...