Narendra Modi movies on OTT : पीएम नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट
मुंबई : Narendra Modi biopic movies : एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी असा नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास आहे. बालपणीचा संघर्ष, रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यापासून सुरू झालेला प्रवास आणि पुढे देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा टप्पा… त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना चित्रपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून पडद्यावर दाखवण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रपट आणि सीरिज पाहायच्या असतील, तर ओटीटीवर उपलब्ध असलेले हे ५ चित्रपट नक्की पाहा.
Narendra Modi web series : १. ‘पीएम नरेंद्र मोदी’
२०१९ मध्ये आलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. मोदींचे बालपण, संघर्ष आणि राजकारणातील पुढचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. विवेक ओबेरॉय यांनी नरेंद्र मोदींची भूमिका साकारली असून ओमंग कुमार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जरीना वहाब आणि मनोज जोशी यांच्याही भूमिका आहेत.
PM Narendra Modi film : २. ‘चलो जीते हैं’
‘चलो जीते हैं’ ही नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर आधारित लघुपट आहे. या चित्रपटात त्यांच्या बालपणीचे संघर्ष आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. आनंद एल. राय आणि महावीर जैन यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट अमेझॉनप्राइम व्हीडीओवर पाहता येतो.
Narendra Modi biopic : ३. ‘मोदी : ए जर्नी ऑफ कॉमन मॅन’
नरेंद्र्र मोदींच्या आयुष्याचा वेगवेगळ्या टप्प्यांतून मागोवा घेणारी ‘मोदी : ए जर्नी ऑफ कॉमन मॅन’ ही वेब सीरिज २०१९ मध्ये आली.
बालपण, आणीबाणीचा काळ आणि त्यांचा राजकीय प्रवास अशा अनेक गोष्टी सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. ही सीरिज अमेझॉनप्राइम व्हीडीओवर उपलब्ध असल्याचे नमूद आहे.
movies based on Narendra Modi : ४. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’
विकी कौशलचा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा २०१६ मधील उरी हल्ल्यानंतर झालेल्या भारतीय लष्करी कारवाईवर आधारित चित्रपट आहे.
या चित्रपटात नरेंद्र मोदींची भूमिका रजित कपूर यांनी साकारली आहे. हा चित्रपट झी५ वर पाहता येतो.
political biopic movies : ५. ‘अवरोध : द सीज विदिन’
सोनी लिववरील ‘अवरोध : द सीज विदिन’ ही वेब सीरिजही नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित आहे. या सीरिजचे दोन सीझन आहेत. यामध्ये नरेंद्र मोदींची भूमिका विक्रम गोखले यांनी साकारली आहे.
पडद्यावर पाहा मोदींच्या प्रवासाची कहाणी
नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील संघर्ष, बालपण आणि राजकीय प्रवास वेगवेगळ्या चित्रपट आणि सीरिजमधून मांडण्यात आला आहे. त्यामुळे राजकारणासोबतच बायोपिक आणि वास्तविक घटनांवर आधारित कथा पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी हे पर्याय उत्सुकता वाढवणारे ठरू शकतात.
Read About : PM Modi Birthday: दिया कुमारींकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक; “त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतो”
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.