पर्वतीय युद्धकौशल्यासह अत्याधुनिक स्वायत्त तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक
नवी दिल्ली : India US Military Exercise भारत आणि अमेरिकेच्या सैन्यादरम्यान उत्तराखंडमधील औली येथे महत्त्वाचा संयुक्त युद्धाभ्यास सुरू झाला आहे. चीन सीमेजवळ आयोजित करण्यात आलेल्या या अभ्यासात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. या युद्धाभ्यासाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये प्रत्यक्ष सैनिकांसोबत रोबोटिक डॉग्स आणि ऑटोनॉमस ड्रोनचाही समावेश करण्यात आला आहे.
एकाच वेळी दोन ठिकाणी सराव
हा युद्धाभ्यास १५ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाला असून तो २८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. हा सराव एकाच वेळी देशातील दोन वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितींमध्ये आयोजित केला गेला आहे
१. औली (उत्तराखंड) : येथील उच्च उंचीवरील फॉरेन ट्रेनिंग नोड वर पर्वतीय युद्धकौशल्य आणि अत्यंत थंड हवामानातील लष्करी कारवायांवर भर दिला जात आहे.
२. महाजन (राजस्थान) : येथील फील्ड फायरिंगवर आधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि एम७७७ होवित्जर सारख्या तोफांमधून लांब पल्ल्याच्या अचूक फायरिंगचा सराव केला जात आहे. या संयुक्त सरावामध्ये दोन्ही देशांचे प्रत्येकी सुमारे ६०० सैनिक (एकूण १२,०० सैनिक) सहभागी झाले आहेत.
बिल्डिंग क्लियरेंस ड्रिल आणि तंत्रज्ञानाचा मेळ
औली येथे झालेल्या सरावामध्ये बिल्डिंग क्लियरेंस आणि रूम इंटरवेंशन ड्रिलचे (इमारतींमधील लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करणे) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्याचा अप्रतिम मेळ पाहायला मिळाला. आकाशातून फिरणारे ड्रोन संपूर्ण इमारतीवर नजर ठेवून सैनिकांना आतल्या हालचालींची अचूक माहिती पुरवत होते. मानवी जीवाला धोका असलेल्या अत्यंत धोकादायक आणि अज्ञात ठिकाणी हे रोबोटिक डॉग्स पाठवून अंतर्गत भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. यामुळे सैनिकांची सुरक्षा वाढते. खऱ्या लष्करी श्वानांचा वापर स्फोटके आणि लपलेल्या शत्रूचा शोध घेण्यासाठी करण्यात आला.
धोरणात्मक आणि लष्करी महत्त्व
या युद्धाभ्यासामुळे अमेरिकेच्या ११व्या एअरबॉर्न डिव्हिजनचे सैनिक आणि भारतीय जवान यांना एकमेकांची युद्धपद्धती, रणनीती आणि प्रगत तंत्रज्ञान समजून घेण्याची मोठी संधी मिळत आहे. आधुनिक काळातील युद्धे ही केवळ मैदानावर न लढता सायबर आणि स्पेस (अवकाश) क्षेत्रातही लढली जातात, यावरही या सरावादरम्यान विशेष चर्चा केली जात आहे. भविष्यातील युद्धांचे स्वरूप बदलणाऱ्या स्वायत्त प्रणाली आणि आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानामध्ये दोन्ही देशांची भागीदारी मजबूत करणे, हा या युद्धाभ्यासाचा मुख्य उद्देश आहे.
Read About : Trump Tariffs, Dollar Dominance and the Global Shift Toward Gold : डॉलर आणि अमेरिका, बायबाय?
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.