शंका आणि वास्तव..!
पुणे: सध्या सर्वत्र एकाच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ( AI Job Threat 2026) मुळे भविष्यात नोकऱ्या धोक्यात येतील का? नोकरदार वर्गाच्या मनात सातत्याने हीच भीती सतावत आहे की, येत्या काळात AI आपली जागा घेईल आणि त्यामुळे आपली नोकरी जाईल. प्रत्यक्षात वास्तव काय आहे जाणून घेऊया या वृत्तांतून..
AIचा वाढता शिरकाव
आजघडीला असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे AI चा शिरकाव झालेला नाही; प्रत्येक क्षेत्रात AI चा वापर आता अटळ झाला आहे. विशेषतः ‘डेटा एंट्री’शी (Data Entry) निगडित कामे, डेटा एंट्री ऑपरेटर, कार्यालयीन प्रशासन (Administration) आणि लिपिक (Clerk) यांसारख्या कामांचे स्वरूप AI मुळे मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. याशिवाय, टेलिमार्केटिंग (Telemarketing) आणि कस्टमर सपोर्ट (Customer Support) यांसारख्या सेवा क्षेत्रांमध्येही AI चा वापर झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणावर होत आहे. थोडक्यात सांगायचे तर, AI चा वापर होत नाही असे एकही क्षेत्र आता शिल्लक राहिलेले नाही.
Future Jobs 2026
या बदलत्या तंत्रज्ञानासोबत आपल्यालाही पावले टाकावी लागतील. जर या प्रगत तंत्रज्ञानाच्या बरोबरीने पुढे जायचे असेल, तर प्रत्येकाला AI चे तंत्र आणि कौशल्य अवगत करावेच लागेल. “AI मुळे भविष्यात किती नोकऱ्या जाणार आहेत?” हा आता खरा प्रश्न राहिलेला नाही. तर, “AI चे कौशल्य (Skills) आत्मसात करून आपण आपली नोकरी कशी टिकवून ठेवणार आहोत?” हा आजच्या घडीचा सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा बनला आहे.
AI चा धोका की संधी?
त्यामुळे AI चा बाऊ किंवा नाहक भीती बाळगण्यापेक्षा, प्रत्येकाने AI शी संबंधित नवीन कौशल्ये शिकण्यावर भर दिला पाहिजे. स्वतःचे ज्ञान (Knowledge) वेळेनुसार अद्ययावत (Upgrade) करणे अत्यंत आवश्यक आहे. जो व्यक्ती तंत्रज्ञानानुसार आपले ज्ञान आणि कौशल्ये अद्ययावत करेल, त्याचीच नोकरी या स्पर्धेच्या युगात टिकून राहील. ‘AI मुळे आपली नोकरी जाईल’ ही भीती मनातून कायमची काढून टाका. जो कोणी AI चा सकारात्मक आणि प्रभावी वापर करायला शिकेल, तोच या बदलत्या काळात आपली नोकरी सुरक्षित ठेवू शकेल. म्हणून एआयची भीती बाळगण्यापेक्षा ते शिका. मित्र बनवा तरच तुमची नोकरी टिकू शकेल.
Read About : AI Investment Cycle वर 2 मोठे धोके; वाढते व्याजदर आणि Monetisation अनिश्चिततेचा तंत्रज्ञान क्षेत्राला फटका
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.