जेट इंजिन, एआय गाईडन्स आणि अँटी-जॅमिंग तंत्रज्ञानामुळे ड्रोनची क्षमता वाढल्याचा दावा, युक्रेनच्या हवाई संरक्षणासमोर नवे आव्हान
मॉस्को : Russia Geran Drones रशिया और युक्रेनमधील युद्धात ड्रोन तंत्रज्ञानाने आता एका अत्यंत घातक आणि नव्या टप्प्यावर प्रवेश केला आहे. रशियाने आपल्या ताफ्यातील जुन्या प्रोपेलरवर चालणाऱ्या गेरान ड्रोन्सचे अत्याधुनिक रूप तयार केले आहे. या ड्रोन्समध्ये थेट जेट इंजिन बसवून त्यांचे रूपांतर क्रूझ मिसाइलसारख्या महाविनाशक शस्त्रात करण्यात आले आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे युक्रेन ची संपूर्ण हवाई संरक्षण यंत्रणा हतबल झाली असून, या नव्या ड्रोन्सना हवेतच रोखणे युक्रेनसाठी कठीण होत आहे.
रशियाचे हे नवे जेट-पावर्ड गेरान-४ आणि गेरान-५ ड्रोन ताशी ६०० किलोमीटरच्या तुफानी वेगाने प्रवास करू शकतात. यांची मारक क्षमता तब्बल १००० किलोमीटर एवढी असून यामध्ये ९० किलो वजनाचा स्फोटक दारूगोळा वाहून नेण्याची क्षमता आहे. तांत्रिकदृष्ट्या अधिक मजबूत करण्यासाठी यामध्ये थर्मल कॅमेरे, अँटी-जॅमिंग लिंक आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित गाईडन्स सिस्टीम बसवली आहे.
एआय सिस्टीममुळे हे ड्रोन शत्रूचा इलेक्ट्रॉनिक अडथळा पार करून स्वत:चा रस्ता आणि लक्ष्य बदलण्यात सक्षम आहेत. पूर्वी युक्रेनची यंत्रणा जुने रशियन ड्रोन ९५ टक्क्यांपर्यंत अचूकतेने पाडत असे. मात्र, जेट इंजिनच्या वेगवान प्रभावामुळे हा दर आता थेट ६० टक्क्यांवर घसरला आहे. रशिया दरमहा हजारोच्या संख्येत या स्वस्त ड्रोन्सचे उत्पादन करत असून युक्रेनचे पॉवर ग्रिड्स आणि लष्करी तळ उद्ध्वस्त करत आहे. हे स्वस्त ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनला पाश्चात्त्य देशांची अत्यंत महागडी संरक्षण क्षेपणास्त्रे खर्च करावी लागत असल्याने त्यांच्यावर प्रचंड आर्थिक दबाव वाढला आहे.
Read About : Water Battery Technology : 3 शतके टिकणारी पाण्याची बॅटरी, हाँगकाँगमधील क्रांतिकारी शोध ऊर्जा क्षेत्रासाठी ठरणार वरदान
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.