बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ पासून; विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता येणार
मुंबई : SSC HSC Exam 2027 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या तारखा लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.
बारावीची परीक्षा कधीपासून?
बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७ ते १६ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. तर प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान घेतल्या जाणार आहेत.
दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक
दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ दरम्यान घेतल्या जाणार आहेत.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा
दहावी आणि बारावीच्या परीक्षा महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येतात. परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध वेळेनुसार अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे विषयांचे नियोजन, सराव परीक्षा आणि पुनरावृत्तीसाठी वेळापत्रक तयार करण्यावर विद्यार्थ्यांनी भर देणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या परीक्षा तारखा
| परीक्षा | लेखी परीक्षा | प्रात्यक्षिक/तोंडी/अंतर्गत मूल्यमापन |
|---|---|---|
| बारावी | ८ फेब्रुवारी – १६ मार्च २०२७ | २० जानेवारी – ६ फेब्रुवारी २०२७ |
| दहावी | १५ फेब्रुवारी – ११ मार्च २०२७ | २८ जानेवारी – १३ फेब्रुवारी २०२७ |
Read About : MPSC Student Protest : मटक्याचे आकडे फुटत नाही, पण पेपर फुटतो..?
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.