Ad Advertisement Ad Advertisement

Gold Salts Therapy – सांधेदुखीवर सोन्याच्या क्षारांची थेरपी; सूज आणि सांध्यांची झीज रोखण्यास मदत

सोन्याच्या क्षारांचा वैद्यकीय उपचारात वापर; रूमेटाइड आर्थरायटिसमधील सूज आणि सांध्यांची झीज नियंत्रित करण्यासाठी थेरपीचा वापर

मुंबई : Gold Salts Therapy मानवी शरीराच्या हालचालींमध्ये हाडांच्या सांध्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. वाढत्या वयानुसार किंवा इतर कारणांमुळे गुडघ्यांच्या दोन हाडांमधील मऊ ऊतींची झीज होते, ज्यामुळे हाडे एकमेकांवर घासली जाऊन मांसल पेशींना सूज येते आणि असह्य वेदना होतात. याला आपण सांधेदुखी किंवा संधिवात म्हणतो. या गंभीर समस्येवर वैद्यकीय क्षेत्रात सोन्याच्या क्षारांचा वापर करून केला जाणारा उपचार प्रभावी ठरत आहे, ज्याला विज्ञान भाषेत क्रायसो थेरपी म्हटले जाते.

औषधोपचारात सोन्याचा वापर करण्याचा इतिहास रंजक आहे. १९ व्या शतकात जर्मन जीवाणूतज्ज्ञ रॉबर्ट कॉक यांनी शोधले की, सोन्याचा अंश असलेले औषध क्षयरोग निर्माण करणाऱ्या जीवाणूंसाठी अत्यंत घातक ठरते. त्यानंतर, १९१९ मध्ये फ्रेंच डॉक्टर फॉरेस्टियर यांनी सांधेदुखीच्या रुग्णांवर सोन्याच्या क्षारांचा प्रयोग सुरू केला. स्नायूंमध्ये हे क्षार टोचल्याने सांधेदुखी कमालीची कमी होत असल्याचे त्यांच्या संशोधनात आढळले.

कशी काम करते ही थेरपी?

वाढत्या वयामुळे हाडांची होणारी झीज आणि शरीराची स्वत:ची रोगप्रतिकारक शक्तीच सांध्यांवर हल्ला करते तो रूमेटाइड आर्थरायटीस. सोन्याचे हे इंजेक्शन शरीरातील अतिसक्रिय रोगप्रतिकारक शक्तीची क्रिया संथ करते. जेव्हा नेहमीची वेदनाशामक औषधे काम करत नाहीत आणि सांधे सुजून निकामी होण्याची वेळ येते, तेव्हा हा उपाय केला जातो. यामुळे आजार मुळापासून पूर्ण बरा होत नसला, तरी सांध्यांमधील सूज कमी होऊन हाडांची पुढील झीज आणि आजाराची तीव्रता यशस्वीपणे रोखली जाते.

रुग्णाच्या गरजेनुसार ही थेरपी वेगवेगळया स्वरूपात दिली जाते

सोन्याची इंजेक्शन्स : ठरावीक कालावधीच्या अंतराने हे इंजेक्शन डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णाच्या स्नायूंमध्ये दिले जाते.

सोन्याच्या गोळ्या : सुईची भीती असणाऱ्यांसाठी ऑरेनोफिन नावाचे सोन्याचे औषध गोळ्याच्या स्वरूपात उपलब्ध आहे.

जेट इंजेक्टर : लहान मुलांमध्ये सुईच्या वेदना आणि संसर्गाचा धोका टाळण्यासाठी, उच्चदाबाच्या पेनसदृश उपकरणाद्वारे हे औषध थेट त्वचेखाली सोडले जाते. हा उपाय गुणकारी असला, तरी सोन्याची इंजेक्शन्स नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनाखालीच घेणे आवश्यक आहे.

Read About : Asian Games 2026 : जोशना चिनप्पा-वेळावन सेंथिलकुमारला स्क्वॉशमध्ये कांस्य
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.