Iran Nuclear Program History : गेल्या ५८ वर्षांत काय बदलले?
Iran Nuclear Program History नवी दिल्ली : १३ दिवसांच्या भीषण युद्धानंतर इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तथाकथित मध्यस्थीनंतर शांत झाला. आता युद्धानंतरचे वाक्युद्ध सुरू आहे. अमेरिका-इस्रायलने खरोखरच अणुबॉम्ब बनवण्याचे इराणचे स्वप्न धुळीस मिळवले का, यावरही काथ्याकूट सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे याच अमेरिकेने इराणमध्ये अणुबॉम्बची पायाभरणी कित्येक वर्षांपूर्वी केली होती.
Iran Nuclear Program History ते वर्ष १९५३ होते. तेव्हा ड्वाइट डी. आयसेनहॉवर अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये (यूएन) ‘शांततेसाठी अणू’ या विषयावर ऐतिहासिक भाषण दिले. शांततेसाठी आणि शांततापूर्ण वापरासाठी अणुतंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे हे त्याचे उद्दिष्ट होते. शीतयुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांना आपल्या बाजूने आणण्याची ही अमेरिकेची रणनीती होती.
‘सीआयए’ने इराणमध्ये घडवला सत्तापालट
१९५३ मध्ये अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने (सीआयए) इराणमध्ये सत्तापालट घडवून आणला. मोहम्मद मोसद्दिक यांना सत्तेवरून काढून टाकून शाह मोहम्मद रझा पहलवी यांच्याकडे सत्ता सोपवण्यात आली. त्यानंतर इराणचे अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलशी संबंध सुधारले. पहलवी यांनी इराणला अणुऊर्जा समृद्ध करण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च केले.
अमेरिकेची इराणला अणुभट्टी भेट
ते १९६० चे वर्ष होते. मैत्री मजबूत करण्यासाठी अमेरिकेने इराणला एक लहान अणुभट्टी भेट दिली. त्याचे नाव तेहरान संशोधन अणुभट्टी होते. ही अणुभट्टी तेहरानमध्ये अजूनही शाबूत आहे. अमेरिकेने इराणचा अणुप्रवास कसा सुरू केला याचा संदेश ती देते.
इराणने कोणत्या देशांशी अणुकरार?
१९७४ मध्ये इराणी शासक शाह मोहम्मद रझा पहलवी पॅरिसला गेले आणि पाच १००० मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्ट्यांसाठी करार केला. यासोबतच युरेनियमचा पुरवठा आणि अणुभट्टी बांधकामासाठी जर्मनी आणि दक्षिण आफ्रिकेसोबत करार करण्यात आले.
अमेरिकेला संशय केव्हा आला?
१९७० च्या दशकाच्या अखेरीस अमेरिकेला संशय आला की शाह मोहम्मद रझा पहलवी अण्वस्त्रे बनवण्याच्या दिशेने काम करू शकतात. त्यामुळे १९७८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी आठ अमेरिकी अणुभट्यांच्या करारात इंधन पुनर्प्रक्रियेवर बंदी घातली.
इस्लामिक क्रांतीनंतर अणुकार्यक्रमाचे काय झाले?
१९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. पुन्हा एकदा इराणमध्ये सत्तापालट झाला. पहलवी युग संपले आणि अयातुल्ला खामेनेई यांनी इराणचा ताबा घेतला. यासोबतच इराण पूर्णपणे मुस्लिम राष्ट्र बनले. नवीन धार्मिक शासकांनी सुरुवातीला अणुकार्यक्रमाला पश्चिमी घुसखोरी मानले आणि त्यावर पुढे काम केले नाही.
इराणचा दृष्टिकोन कसा आणि केव्हा बदलला?
इराणचे इराकशी संबंध फारसे चांगले नव्हते. इराकसोबत आठ वर्षांच्या युद्धानंतर खमेनेई यांना अणु तंत्रज्ञानाचे लष्करी महत्त्व समजले. अशा परिस्थितीत इराणने अण्वस्त्र सक्षम होण्यासाठी पाकिस्तानकडे मोर्चा वळवला.
इराणला अण्वस्त्रे बनवण्यात कोणी मदत केली?
इराणने नंतर पाकिस्तानी अण्वस्त्रशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांच्याशी संपर्कातून पाकिस्तानकडून ‘सेंट्रीफ्यूज’ तंत्रज्ञान खरेदी केले. त्याद्वारे युरेनियम शस्त्रांच्या पातळीपर्यंत समृद्ध केले जाऊ शकते.
गुप्त आण्वित प्रकल्प उघडकीस
पाकिस्तानच्या मदतीने इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पुन्हा रुळावर येऊ लागला. विशेष म्हणजे अमेरिका आणि युरोपला अद्याप त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. २००२ मध्ये, इराणमधील विरोधी गटांकडून तसेच उपग्रह छायाचित्रे आणि गुप्त माहिती मिळाल्यानंतर, अमेरिका आणि युरोपह संपूर्ण जगाचे डोळे उघडले. त्यानंतर अमेरिका आणि युरोपने इराणवर दबाव आणण्यास सुरुवात केली.
अखेर दोन दशकांनंतर हल्ला
इराणशी अण्वस्त्र चर्चा आणि निर्बंध दोन दशके चालू राहिले, परंतु इराणने अण्वस्त्र कार्यक्रम थांबवला नाही. अलीकडेच, २४ जून २०२५ रोजी, इराण आणि इस्रायल युद्धादरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अण्वस्त्र स्थळांवर लष्करी हल्ला करण्याचे आदेश दिले. अमेरिकी ‘बंकर बस्टर’ विमानांनी नतान्झ, अरक आणि फोर्डो अण्वस्त्र स्थळे नष्ट केली.
आता इराणच्या अणुकार्यक्रमाचे काय होईल?
इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी म्हणतात की इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमाला झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमेरिकी विचारगट ‘मिडल इस्ट प्रोग्राम ऑफ डिफेन्स प्रायोरिटीज’च्या संचालक रोझमेरी कलानिक म्हणतात की जर इराणचे आण्विक प्रकल्प अमेरिकी हल्ल्यात नष्ट झाले असतील तर ते अधिक वेगाने आणि शक्तीने ते विकसित करण्याचा प्रयत्न करतील.
न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय बाबींचे तज्ज्ञ प्रा. अँथनी बर्क म्हणतात की इराणकडे अण्वस्त्रे बनवण्याचे दोन मार्ग आहेत. इराण युरेनियम समृद्धीकरण सुरू ठेवू शकते. रशिया किंवा उत्तर कोरियाकडून अणुस्फोट संरचना विकत घेऊ शकते आणि दुसरा मार्ग म्हणजे इराण थेट रशियाकडून काही अण्वस्त्रे विकत घेऊ शकतो.
Read About : Bihar Women Atrocities : व्यवस्थेमुळेच बिहारमध्ये महिला अत्याचार
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.