Ad Advertisement Ad Advertisement

Flood Victims Threatened With Gun – पूरग्रस्तांवर पिस्तूल रोखणाऱ्या मकेरच्या स्टेशन हाऊस ऑफिसर वर निलंबनाची कारवाई

पूरग्रस्तांवर सर्व्हिस पिस्तूल रोखल्याचा व्हिडिओ व्हायरल

छपरा : Flood Victims Threatened With Gun बिहारमधील सारण (छपरा) जिल्ह्यातील मकेर भागात पूरग्रस्तांवर थेट सर्व्हिस पिस्तूल रोखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर अखेर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. सारणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रोशन कुमार यांनी याप्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश देत मकेर पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर संग्राम कुमार सिंग यांना निलंबित केले आहे. निलंबनाच्या काळात त्यांची रवानगी सारण पोलीस केंद्रात करण्यात आली असून, त्यांची सखोल विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

ही धक्कादायक घटना सारण जिल्ह्यातील मकेर भागातील रेवा घाटाजवळ रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी घडली होती. रेवा घाटावर पूरग्रस्तांसाठी प्रशासनाकडून रेशन आणि इतर जीवनावश्यक मदत साहित्याचे वाटप सुरू होते. यावेळी मदत मिळवण्यासाठी साहित्याच्या गाड्यांभोवती स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे तेथे काही वेळातच गोंधळ आणि कमालीची तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती हा ताळण्यासाठी मकेर पोलीस ठाण्याचे एसएचओ संग्राम कुमार सिंग हे एका पिकअप ट्रकवर चढले. मात्र, संतप्त आणि हवालदिल झालेल्या जमावाला शांतपणे नियंत्रित करण्याऐवजी त्यांनी पूरग्रस्तांना आधी आपले बूट दाखवले. त्यानंतर अत्यंत संतापजनक कृत्य करत त्यांनी स्वतःची सर्व्हिस पिस्तूल बाहेर काढली आणि थेट समोर उभ्या असलेल्या निष्पाप लोकांवर रोखली.

हा सर्व प्रकार तेथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हवालदिल झालेल्या पूरग्रस्तांवर अशा प्रकारे बंदूक रोखल्याचा आणि पोलिसांकडून गैरवर्तन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आणि बिहार पोलिसांवर चहूबाजूंनी तीव्र टीका होऊ लागली.

प्रथमदर्शनी हा प्रकार गंभीर निष्काळजीपणा, शिस्तभंग आणि अधिकाराचा गैरवापर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसएचओ संग्राम कुमार सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Read About : Liquor Smuggling – गॅस सिलिंडरमध्ये दारूचा गुप्त कप्पा; बिहारमध्ये 127 बाटल्या जप्त
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.