अमेरिकेकडून स्टारलिंकच्या काही सेवांवर वेगमर्यादा घातल्याचा दावा; युक्रेनच्या लष्करी ड्रोन मोहिमा आणि हवाई संरक्षणासमोर नवी आव्हाने
एक्सेटर (ब्रिटन) : Starlink Speed Limit on Ukraine अमेरिकेने स्टारलिंकच्या वेगावर अचानक घातलेल्या मर्यादांमुळे युक्रेनची लष्करी आणि हवाई सुरक्षा यंत्रणा मोठ्या संकटात सापडल्याचा दावा ब्रिटनमधील एक्सेटर विद्यापीठातील प्राध्यापक अँथनी किंग यांनी ‘द कन्व्हर्सेशन’मध्ये लिहिलेल्या विश्लेषणात्मक वृत्तात केला आहे. रशिया-युक्रेन युद्धात गेल्या चार वर्षांहून अधिक काळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारी आणि युक्रेनच्या सैन्यासाठी पाठीचा कणा ठरलेली एलॉन मस्क यांच्या कंपनीची ‘स्टारलिंक’ ही डिजिटल उपग्रह संपर्क यंत्रणा त्यामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
१३ आणि १४ ऑक्टोबरच्या रात्री, कोणतीही पूर्वकल्पना न देता ‘स्पेस-एक्स’कडून काही स्टारलिंक सेवांच्या वेगावर ताशी १६० किलोमीटरची मर्यादा घालण्यात आली. या मर्यादेचा फटका स्टारलिंक तंत्रज्ञानावर चालणारे युक्रेनचे हजारो ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांना बसला. युक्रेनच्या सातव्या जलद कृती दलाच्या अनेक महत्त्वाच्या लष्करी मोहिमा ऐनवेळी रद्द कराव्या लागल्या आहेत.Starlink Speed Limit on Ukraine
हवाई सुरक्षेला धक्का
रशियाकडून युक्रेनच्या शहरांवर आणि ऊर्जा प्रकल्पांवर होणाऱ्या प्राणघातक ड्रोन हल्ल्यांना रोखण्यासाठी ताशी १६० किमीचा वेग अत्यंत कमी पडत आहे, ज्यामुळे रशियन ड्रोन्स रोखणे युक्रेनला कठीण जात आहे.
मस्क आणि अमेरिकी सरकारची भूमिका
या स्पीड लिमिटमुळे युक्रेनच्या संरक्षणाला मोठा फटका बसला असून, एलॉन मस्क यांनी यामागचे कारण अमेरिकी सरकार असल्याचे ‘एक्स’वर स्पष्ट केलेे. यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्ये मस्क यांनी स्वत: निर्णय घेऊन युक्रेनला क्रिमियावर हल्ला करण्यासाठी स्टारलिंक वापरू दिले नव्हते. परंतु, आता ऑक्टोबर २०२६ मध्ये अमेरिकी प्रशासनाकडूनच या सेवांवर निर्बंध आणले जात आहेत, ज्यामुळे युक्रेन पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडले आहे. युक्रेनच्या सैन्याने यापूर्वी स्पष्टपणे कबूल केले होते की, स्टारलिंक नसते तर आम्ही हे युद्ध कधीच हरलो असतो. यावरून त्याचे महत्त्व स्पष्ट होते.
Read About : BioWare Studio Closure : बायोवेअर बंद, गेमिंग विश्वाला मोठा धक्का; Mass Effect 5 बाबत मोठा दावा
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.