Ad Advertisement Ad Advertisement

AI Tool Uses Selfies – सेल्फीवरून कळणार कॅन्सर रुग्णांच्या जगण्याचा अंदाज? AI संशोधनातून नवी आशा

AI टूल चेहऱ्याच्या फोटोवरून जैविक वय आणि कॅन्सर रुग्णांच्या जगण्याच्या जोखमीचा अंदाज घेण्याचा करते प्रयत्न

नवी दिल्ली : AI Tool Uses Selfies आता मोबाईलने काढलेली एक साधी सेल्फी देखील कॅन्सर रुग्णांचे आरोग्य आणि त्यांच्या जगण्याच्या शक्यतेचा अंदाज लावण्यास मदत करू शकते. अमेरिकेतील मास जनरल ब्रिघमच्या संशोधकांनी एका अभ्यासानुसार, एआय आधारित एक नवीन टूल विकसित केले आहे. हे टूल चेहऱ्यावरून रुग्णाचे जैविक वय आणि कॅन्सरशी संबंधित जोखमींचे मूल्यांकन करते.

या संशोधनात दोन महत्त्वाचे एआय टूल विकसित केले गेले आहेत

१. फेस ऐज : चेहऱ्याच्या आधारे रुग्णाचे जैविक वय मोजून कॅन्सरमध्ये वाचण्याच्या संभाव्यतेचा अंदाज घेते. हे टूल कपाळ आणि नाकाभोवतीच्या रेषांचे विश्लेषण करते.
२. फेससर्वाइवल : चेहऱ्याच्या फोटोवरून थेट जगण्याच्या जोखमीचा अंदाज लावते. हे डोळ्यांखालील भाग आणि नाकाच्या वरच्या भागावर लक्ष केंद्रित करते.

तज्ज्ञांच्या मते, हा एआय मॉडेल ४ कोटींहून अधिक चेहऱ्यांच्या फोटोंवर प्रशिक्षित करण्यात आला आहे. मात्र, हे तंत्रज्ञान सध्या केवळ संशोधनाच्या पातळीवर आहे. फोटोवरून लावलेला अंदाज हा प्रत्यक्ष वैद्यकीय चाचण्या, कॅन्सरचा प्रकार किंवा स्टेज (अवस्था) यांची जागा घेऊ शकत नाही. भविष्यात डेटा सुरक्षितता आणि विविध त्वचेच्या रंगांसाठीची अचूकता सिद्ध झाल्यास, हे टूल डॉक्टरांना उपचाराचे निर्णय घेण्यासाठी अतिरिक्त मदत करू शकते.

Read About : AI Impact on Indian Students- एआयमुळे गती वाढली मात्र सखोल ज्ञानाचा अभाव!

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.